घटत्या लोकसंख्येविषयी चिंता व्यक्त !
अमरावती (आंध्रप्रदेश) : आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एका कार्यक्रमात बोलतांना विवाहित जोडप्यांना अधिक मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला. तसेच चंद्राबाबू नायडू यांनी या वेळी वृद्धांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू पुढे म्हणाले की,
१. लोकसंख्या घटणे आणि तरुणांचे स्थलांतर, हे राज्यासाठी धोकादायक ठरू शकते. लोकसंख्या व्यवस्थापन अंतर्गत कायदा आणण्याचाही विचार चालू असून यामध्ये मोठ्या कुटुंबांना प्रोत्साहन देण्याचा विचार आहे.
२. दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास प्रतिबंध करणारा पूर्वीचा कायदा सरकारने रहित केला आहे.
३. दोनपेक्षा अधिक मुले असलेल्या लोकांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता याव्यात, यासाठी सरकार कायदा आणण्याचा विचार करत आहे.
४. राज्यातील प्रजनन दर १.६ वर आला आहे, जो राष्ट्रीय सरासरी २.१ पेक्षा फारच अल्प आहे. या दिशेने पावले न उचलल्यास आंध्रप्रदेशाला जपान आणि युरोप यांच्यासारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल.
संपादकीय भूमिकाअसा चुकीचा सल्ला देणारे राज्यकर्ते कधी समाजाचे भले करू शकतील का ? नायडू यांचा हा सल्ला म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ यातला प्रकार आहे ! त्यापेक्षा त्यांनी तरुणांची कार्यक्षमता आणि कौशल्य वृद्धींगत करण्यावर भर देणे अधिक संयुक्तिक ठरेल ! |