तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी नवीन ‘लोगो’ सिद्ध करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील स्वारस्य असणार्यांना सादरीकरणासाठी १९ सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित करण्यात आले होते. २३ सप्टेंबरपर्यंत ई-मेलवर लोगो सादर करणार्या व्यक्तींचे लोगो विचारात घेऊन त्यानुसार सर्व लोगोंची पडताळणी पाळीकर पुजारी मंडळ, भोपे पुजारी मंडळ आणि उपाध्ये पुजारी मंडळाच्या प्रतिनिधींकडून, तसेच चित्रकला क्षेत्रातील तज्ञ, मंदिराचे विश्वस्त, अधिकार्यांकडून करण्यात आली. यातून ५ लोगोंची निवड केली आहे. आता मतदान प्रक्रिया राबवून सर्वाधिक पसंती मिळालेल्या लोगोस ‘मंदिर संस्थांचा लोगो’ म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी ३ नोव्हेंबरपर्यंत मतदान करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
हे ५ लोगो मंदिराच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. भाविकांनी मतदान करण्यासाठी https:/shrituljabhavanitempletrust.org या संकेतस्थळावरील मुख्य पानावर (होमपेजवर) जाऊन लोगोची पहाणी करून पसंत असलेल्या लोगोसाठी मतदान करावे.