Elon Musk On ‘Ballot Paper’ : निवडणुका ‘बॅलट पेपर’द्वारे घ्याव्यात !

एलॉन मस्क

पेनसिल्व्हेनिया (अमेरिका) – ‘ईव्हीएम्’ यंत्राचा वापर करून निवडणुकीत हेराफेरी केली जात असल्याने निवडणुका ‘बॅलट् पेपर’द्वारे  घेण्यात याव्यात, असे मत अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी व्यक्त केले.

मस्क यांनी ‘डोमिनियन’ आस्थापनाच्या मतदानयंत्रांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्‍न उपस्थित केले. ते म्हणाले की, फिलाडेल्फिया आणि ऍरिझोना व्यतिरिक्त ही मतदानयंत्रे इतरत्र कुठेही वापरली जात नाहीत. या दोन्ही ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला. हा एक विचित्र योगायोग आहे. संगणकचा ‘प्रोग्राम हॅक’ करणे सोपे आहे, त्यामुळे त्यांच्यावर विश्‍वास ठेवता येत नाही.

मतदानयंत्रे बनवणार्‍या आस्थापनाने मस्क यांचा आरोप फेटाळला !

मतदानयंत्रे बनवणार्‍या ‘डोमिनियन’ या आस्थापनाने मस्क यांचा आरोप फेटाळून लावला आहे. आस्थापनाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘डोमिनियन’ फिलाडेल्फिया राज्यात सेवा देत नाही. ते म्हणाले, ‘‘आम्ही अनेक वेळा मतदानयंत्राद्वारे केलेले मतदान आणि ‘बॅलट् पेपर’द्वारे केलेले मतदान, यांची मोजणी एकत्र करून ‘ऑडिट’ केले आहे. त्यात मतदानयंत्र योग्य मोजणी करत असल्याचे सिद्ध झाले आहे.

निवडणुकीसाठी अवघे १५ दिवस शेष !

अमेरिकेत ५ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प तिसर्‍यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस या त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. या निवडणुकीमध्ये एलॉन मस्क उघडपणे ट्रम्प यांच्या समर्थनार्थ प्रचार करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • भारतात काँग्रेसवाले, साम्यवादी आदी जी मागणी करतात, तीच आता एलॉन मस्क यांनी करणे, हा ‘योगायोग’ कसा ?
  • ‘पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्‍या मस्क यांचे हे विचार समाजाला मागे घेऊन जाणारे आहेत’, असे आता कुणी का म्हणत नाही ?