पिंपरी (जिल्हा पुणे) – राज्याच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची पहिली ९९ उमेदवारांची सूची भारतीय जनता पक्षाकडून घोषित करण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भोसरी मतदारसंघातून महेश लांडगे यांना उमेदवारी दिली आहे. नुकतेच अश्विनी जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत चिंचवडची उमेदवारी शंकर जगताप यांनाच द्यावी, अशी मागणी केली होती.