पुणे – मुळशी तालुक्यातील खांबोली तलाव परिसरात मित्र-मैत्रिणींसमवेत फिरायला गेलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. तलावात पोहोण्यासाठी उतरल्यानंतर दोघेही गाळामध्ये अडकले आणि त्यानंतर दोघेजणही बुडाले. या घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस, तसेच अग्नीशमनदलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना बाहेर काढण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.