मध्यप्रदेशात ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा

अवघ्या ५ मासांत निकाल

मध्यप्रदेशातील न्यायालय अवघ्या ५ मासांत अशा प्रकारचा निर्णय देऊ शकते, तर अन्य राज्यांमध्ये बलात्काराच्या खटल्यांना निकाली काढण्यास वेळ का लागतो ?

छिंदवाड़ा (मध्यप्रदेश) – राज्यातील जमुनिया गावामध्ये ५ मासांपूर्वी ३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून नंतर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी दोषीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

या खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात आला होता. रितेश उपाख्य रोशन धुर्वे याला फाशी, तर धनपाल उईके याला ७ वर्षे कारावास आणि आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.