देहलीत प्रदूषण असल्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी गोवा भेटीवर

पणजी, २० नोव्हेंबर (वार्ता.) – देहली येथे प्रदूषण असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचा पुत्र राहुल गांधी गोव्यात आले आहेत. एका खासगी जेट विमानाने २० नोव्हेंबरला दुपारी ते गोव्यात आले.

देहली येथे प्रदूषणाने कळस गाठला आहे. सोनिया गांधी यांना छातीत रोगजंतू संसर्गाचा त्रास झाला. या पार्श्‍वभूमीवर डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना देहली सोडण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गोव्याच्या स्वच्छ हवेत दिवस घालण्यासाठी ते गोव्यात आले आहेत. (देहलीत प्रदूषण म्हणून गोव्यात येणारा गांधी परिवार देहलीतील प्रदूषण अल्प होण्यासाठी काहीच का करत नाही ? – संपादक)