भोंग्यांमागील ढोंगी !

इस्लामनुसार अजान ही सचेतन व्यक्तीने द्यावयाचे असते; मात्र ‘अजान देणाऱ्या व्यक्तीचा आवाज भोंग्यांतून बाहेर पडणे’, हे खरे तर इस्लामच्या विरोधात आहे. त्यामुळे काही इस्लामिक राष्ट्रांत अजानसाठी आजही भोंग्यांचा वापर केला जात नाही.

आदर्श उद्योगरत्न !

८४ वर्षीय रतन टाटा यांच्यासारखा उत्साहाचा खळखळता झराच भारत देशाला लाभला आहे. त्यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व पुन्हा निर्माण होणे विरळाच ! त्यांच्यासमोर प्रत्येकाने नतमस्तक व्हायला हवे. देशाच्या यशोशिखरात मानाचा तुरा रोवणारी रतन टाटा यांच्यासारखी व्यक्ती प्रत्येक भारतियाच्या मनात अजरामर राहील, हे निश्चित !

आंदोलनांचे उत्तर काय ?

सर्वाेच्च न्यायालयाचा हा निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलासादायक असला, तरी जे निर्णय प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहेत, त्यासाठी त्यांना लढा द्यावाच लागणार आहे. अशी आंदोलने, बंद पुकारणे, निवेदने, मागण्या हे प्रशासनाचे अपयश आहे, हे वारंवार दाखवत रहाणे आणि सक्षम प्रशासनाची मागणी करणे, एवढेच सध्या जनतेच्या हातात आहे.

बहुपत्नीत्व आणि सुधारणावाद !

लोकसंख्येचा विस्फोट रोखण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी समान नागरी कायदा हा एक उत्तम उपाय असू शकतो. त्यामुळे या कायद्याला वेगवेगळ्या प्रकारे धर्मांध विरोध करत असतील, तर तो लवकरात लवकर अस्तित्वात येण्यासाठी हिंदूंनीही संघटित होऊन सरकारला तो आणण्यासाठी दबाव आणायला हवा.

उत्तरप्रदेश सरकारचे यश !

आक्रमक धर्मांधांना चुचकारून किंवा त्यांच्यासमोर मान तुकवून ते सुधारत नाहीत, तर त्यांच्या विरोधात तितक्याच आक्रमकपणे कायदा आणि नियम यांची कार्यवाही करून त्यांना वठणीवर आणता येते. हे उत्तरप्रदेश सरकारला जमल्यामुळे भोंग्यांमुळे भारतभरातील वातावरण ढवळून गेले असता उत्तरप्रदेशमध्ये मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. हिंदूंसाठी मात्र हे सुखावह चित्र आहे.

धर्मांतराच्या अंतहीन क्लृप्त्या !

इंग्रज ख्रिस्ती प्रथांची देण आपल्याला देऊन गेले आणि आपण त्याच्या आधीन झाल्याने त्यांना धर्मपरिवर्तन करणे सोपे जात आहे. हिंदूंनी स्वधर्माचे महत्त्व जाणून धर्माचरण केले, तर आणि तरच त्यांचे ख्रिस्तीकरण थांबू शकते, हे हिंदुत्वनिष्ठांनी लक्षात घेतले पाहिजे !

राजकारण्यांचा ‘धंदा’ !

भुजबळांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती कोणत्या धंद्याद्वारे मिळवली, हे सर्वसामान्य जनतेला ठाऊक नाही’, असे कसे म्हणणार ? ‘राजकारण्यांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती कोणत्या धंद्यातून त्यांना मिळते ?’ जनतेला याचे उत्तरही ठाऊक आहे; मात्र जनता ते सिद्ध करून दाखवू शकत नाही, असा ‘प्रामाणिक धंदा’ हे राजकारणी करत आहेत !

‘मलबार गोल्ड’चा हिंदुद्वेष !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात राहून ही आस्थापने, संघटना, संस्था हिंदुविरोधी कारस्थाने रचत असतांना त्यांना वैध मार्गाने विरोध करण्याची कृती सर्वाेत्तम आहे. हिंदूंचा सन्मान विज्ञापनकर्ता, अभिनेते, अभिनेत्री, चित्रपट अथवा मालिका निर्माते यांनी राखणे आवश्यकच आहे, अन्यथा वैध मार्गाने विरोध ठरलेलाच आहे, हे निश्चित !

साहित्य संमेलन कि विधीमंडळ अधिवेशन ?

साहित्य महामंडळाचे आणि संमेलनाचे आयोजक यांना खरोखरच साहित्याचा उत्कर्ष साधायचा असेल, तर गर्दी जमवण्यात रस दाखवण्याऐवजी त्यांनी मराठीचा उत्कर्ष करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. असे केल्यास त्यांना राजकारण्यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची वेळ येणार नाही !

पेरू देशाचे स्वागतार्ह पाऊल !

पेरू देशात ४८ वर्षीय व्यक्तीने ३ वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. तेथेही ‘अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी’, अशी मागणी करण्यात आली. यानंतर अल्पावधीतच सरकारने धाडसी पाऊल उचलले.