व्हेनेझुएलामध्ये २ मोठे भूकंप !
राष्ट्रीय आणीबाणी घोषित
काराकास (व्हेनेझुएला) – दक्षिण अमेरिका खंडातील देश व्हेनेझुएलामध्ये २४ जूनच्या रात्री १० वाजता झालेल्या २ दोन शक्तीशाली भूकंपांमुळे प्रचंड मोठी हानी झाली आहे. ३९ सेकंदाच्या अंतरांनी आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ७.२ आणि ७.५ मोजली गेली. यामुळे राजधानी कराकाससह अनेक शहरे हादरली. या भूकंपामुळे रस्ते मधोमध दुभंगले असून अनेक इमारतींना मोठे तडे गेले आहेत, तर काही घरे पत्त्यासारखी कोसळली आहेत. शहरातील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच आपत्कालीन पथकांकडून नागरिकांना ढिगार्याखालून काढण्याचे शर्तीचे प्रयत्न दिसून येत आहे. या भूकंपात आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला, ही माहिती अद्याप समोर आली नसली, तरी मृतांचा आकडा १० सहस्र ते १ लाख इतका असू शकतो, अशी भीती वर्तवण्यात आली आहे. आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू, तर ७०० हून अधिक लोक घायाळ झाल्याची माहिती मिळाली आहे. कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.
🚨 Venezuela Devastated by Twin Earthquakes
Two powerful earthquakes of 7.2 and 7.5 magnitude struck northern Venezuela within seconds, leaving at least 164 dead and 971+ injured.
A national state of emergency has been declared. Caracas and La Guaira have suffered severe… pic.twitter.com/pD5aJ5Xhxb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 25, 2026
पहिला धक्का रात्री १०:०४ वाजता सॅन फेलिप शहराजवळ बसला, ज्याची तीव्रता ७.२ एवढी होती. यानंतर अवघ्या ३९ सेकंदांनंतर युमारे शहराजवळ ७.५ तीव्रतेचा दुसरा आणि अधिक शक्तीशाली धक्का बसला. हे दोन्ही भूकंप एकमेकांपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर झाले. याचे धक्के शेजारील देश कोलंबियामध्येही जाणवले. पुढील काही घंटे भूकंपानंतरचे लहान धक्के येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, घरातील शीतकपाट आणि कपाट यांमधील वस्तू भूमीवर पडल्या. असा भयानक अनुभव कधीच आला नव्हता.
८० वर्षांच्या एका वृद्ध महिलेने सांगितले की, हा भूकंप वर्ष १९६७ मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपापेक्षाही अधिक भयानक होता.
अमेरिका साहाय्य करणार ! – डॉनल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
अमेरिका साहाय्य करण्यास पूर्णपणे सिद्ध, इच्छुक आणि सक्षम आहे. मी माझ्या सरकारच्या सर्व यंत्रणांना तात्काळ सिद्धता करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही आमच्या नवीन आणि चांगल्या मित्रांच्या पाठीशी उभे राहू. भूकंपानंतर तेथील परिस्थिती सांगणारे प्राथमिक अहवाल चांगले नाहीत.
भारत आवश्यकता पडल्यास व्हेनेझुएलाला सर्वतोपरी साहाय्य करण्यास सिद्ध ! – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर म्हटले,
Deeply saddened by the devastation caused by the severe earthquakes in Venezuela.
On behalf of the people of India, I extend our heartfelt condolences to the Government and people of Venezuela, especially to the families who have lost their loved ones. We pray for the speedy…
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2026
‘या कठीण काळात भारत व्हेनेझुएलाच्या लोकांसमवेत उभा आहे आणि आवश्यकता पडल्यास सर्वतोपरी साहाय्य करण्यास सिद्ध आहे.’


भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister