पाकच्या गुप्तचर यंत्रणांचा दावा

क्वेट्टा (बलुचिस्तान) – पाकिस्तानी गुप्तहेर सूत्रांचा दावा आहे की, बलुची स्वातंत्र्यसैनिकांना आता इस्रायली यंत्रणांकडून पैसा, तंत्रज्ञान आणि आधुनिक दळणवळणाची साधने मिळत आहेत. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर त्यांच्या तळांसाठी आणि हालचालींसाठी केला जात आहे.
बलुचिस्तानमधील जियारत येथील मांगी डॅम पंपिंग स्टेशनच्या पोलिस चौकीवर आक्रमण झाले. यात बलुच स्वातंत्र्यसैनिकांनी ९ पोलिसांची हत्या केली आणि १८ जणांचे अपहरण केले. नंतर या सर्वांचे मृतदेह टेकड्यांवर सापडले. या घटनेनंतर पाकच्या गुप्तहेरांनी हा दावा केल्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
बलुची लोकांमध्ये संताप
बलुचिस्तान हा पाकिस्तानने वर्ष १९४८ टक्के बळकावलेला भाग आहे. पाकच्या एकूण लोकसंख्येत त्याची भागीदारी ६ टक्केच आहे. येथे तांबे, सोने, कोळसा, नैसर्गिक वायूचे मोठे साठे आहेत. यातील उत्पन्नाचा मोठा भाग पाक सरकार, सैन्य आणि चिनी आस्थापने यांना जात असल्याचा आरोप आहे. यामुळे बलुची लोकांत संताप आहे.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !