हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !

टोळीकडून अन्य एकाला मारहाण करतांनाचा हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याने व्हिडिओ बनवल्याचा राग !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – हडपसर येथील १५ नंबर चौकात मारहाणीच्या घटनेचा एक व्हिडिओ चित्रित केल्याच्या रागातून हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते श्री. नवनाथ लांडगे यांना साहिल शेख आणि त्याच्या ८ ते १० साथीदारांनी बेदम मारहाण केली. आरोपींनी श्री. लांडगे यांना त्यांच्या भ्रमणभाषमधील व्हिडिओ पुसून टाकण्यास भाग पाडले. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता मोठ्या संख्येने हडपसर पोलीस ठाण्यात एकत्रित जमले होते. या प्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे.

१. १३ जुलैच्या रात्री ११ वाजता तक्रारदार श्री. नवनाथ लांडगे हे भाजी घेऊन घरी चालले होते. त्या वेळी १५ नंबर चौकात साहिल शेख आणि त्याचे ८ ते १० साथीदार एका व्यक्तीला मारहाण करत होते. लांडगे यांनी या मारहाणीचे चित्रीकरण करणे चालू केले.
२. व्हिडिओ काढत असल्याचे पहाताच साहिल शेख आणि त्याच्या साथीदारांनी श्री. लांडगे यांना घेरले अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
३. आरोपींपैकी एकाने लांडगे यांचा भ्रमणभाष हिसकावून घेत त्यातील व्हिडिओ पुसण्यास भाग पाडले, तसेच ‘हाच तो चालक आहे’, असे म्हणत शिवीगाळ करून लांडगे यांचा स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये व्हिडिओ बनवला.
४. मारहाण चालू असतांनाच घटनास्थळी पोलीस पोचल्याने पुढील अनर्थ टळला. घायळ झालेले श्री. लांडगे यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले.

संपादकीय भूमिका

धर्मांधांची मजल कुठपर्यंत गेली आहे ?, हे यावरून लक्षात येते. मारहाण करायची त्याचा कुणी व्हिडिओ बनवत असेल, तर त्यालाही मारहाण करायची आणि पुरावा पुसण्यास भाग पाडायचे, हा उद्दामपणा आहे. अशांवर वेळीच कठोर कारवाई न केल्याचा परिणाम !