पंचमहाभूतांमधील असंतुलन : कलियुगातून सत्ययुगाकडे वाटचाल !

पंचमहाभूतांच्या असंतुलनामुळे पृथ्वीवर विनाश

‘सनातन धर्मग्रंथांनुसार युगपरिवर्तन हे केवळ एका कालखंडाचा अंत नाही, तर एक व्यापक नैसर्गिक, आध्यात्मिक आणि वैश्विक घटना असते. जेव्हा एका युगातून दुसर्‍या युगात संक्रमण होते, तेव्हा हे परिवर्तन संपूर्ण ब्रह्मांडात स्पष्टपणे अनुभवले जाते. युगपरिवर्तनाची ही प्रक्रिया केवळ मानवीय आणि सामाजिक घटनांपुरती मर्यादित रहात नाही, तर पंचमहाभूतांमध्येही (पृथ्वी, आप (जल), तेज (अग्नि), वायु आणि आकाश यांच्यातही) विलक्षण असंतुलन निर्माण होते. आपण सध्या पहात असलेल्या घटना या आपण कलियुगातून सत्ययुगाकडे वाटचाल करत आहोत, याचे निदर्शक आहेत.

संकलक : प.पू. पंडित काशीनाथ मिश्र, ओडिशा

अधर्म हाच पृथ्वीवरील विनाशाला कारणीभूत

पंचसख्यांनी ‘मालिका शास्त्रा’मध्ये ‘भगवान कल्की पंचमहाभूतांच्या माध्यमातून विनाशाची लीला करतील, असे लिहिले आहे. ‘जुगाब्दि गीता’ या ग्रंथामध्ये महापुरुष अच्युतानंद दास लिहितात,

‘काहिं जल रुपे मुहिं जगत नासीबी ।

काहि पवन रूपरे सकल ग्रासीबी ।

काहिं जोगमाया होई संहार करीबी ।

काहीं निजे विश्व रुप धारण करीबी ।

काहीं मौऊन व्रत में धारण करीबी ।

काहीं काल रुपे मुर्हि पार्पिकु नासीबी ।’

अर्थ : भगवान पंचतत्त्वांच्या आधारे धर्माची स्थापना करतील. आकाश, वायु, अग्नि, जल आणि पृथ्वी ही सर्व पंचमहाभूते, जागतिक युद्ध अन् रोगराई भगवंताच्या लीलेचे माध्यम बनतील.

प.पू. पंडित काशीनाथ मिश्र

‘चकडा मडाण ग्रंथ’ यात महापुरुष अच्युतानंद लिहितात,

‘चिन्हि छत्र हेब ए सुना संसार, भय न पड़िवे केहि ।

गुपत मारुणि ग्रामे ग्रामे हेब तोतेमु देलि चेताई ।

एही घोर कलि लीला भड़ि भड़ि, प्राणी हेवे पत्थभड़ां ।

माया अंधकारे गुणि रहिधिवे आंखि थाई सेजे कणां ।’

अर्थ : पापामुळे ही सुवर्ण पृथ्वी भंग पावेल आणि कोणतेही कारण अन् आजार नसतांना लोक मरतील. याला ‘गुप्त मृत्यू’ म्हणतात. त्या वेळी ही सर्व लक्षणे दिसत असूनही लोक काहीही न पाहिल्याचे नाटक करतील.

– प.पू. पंडित काशीनाथ मिश्र, ओडिशा

  • पृथ्वीतत्त्वाच्या असंतुलनामुळे आपत्काळ

सध्या भूकंपांची वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे, ती दर्शवते की, पृथ्वीची भूवैज्ञानिक रचना अस्थिर होत आहे. भूमीला मोठ्या भेगा पडत आहेत आणि त्या सातत्याने विस्तारीत होत आहेत. प्रतिवर्षी लाखो हेक्टर शेतभूमी नष्ट होत आहे. त्यामुळे जागतिक अन्नसंकट निर्माण होत आहे. भूमीतील अस्थिरतेमुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि भूगर्भीय हालचाली तीव्र होत आहेत.

  • आपतत्त्वाच्या असंतुलनामुळे पाण्याची विषम स्थिती

अनेक देश आणि शहरे येथील पाण्याची समस्या अधिक गंभीर होत आहे. अनेक शहरांमध्ये पिण्यायोग्य पाणी शिल्लक नाही. अवेळी होणारा मुसळधार पाऊस आणि पूर यांमुळे संपूर्ण गावे अन् शहरे पाण्याखाली जात आहेत. समुद्र आणि नद्या यांची पातळी अचानक वाढत आहे. त्यामुळे किनारपट्टीचे भाग पाण्याखाली जात आहेत आणि अनेक बेटे बुडत आहेत. सुनामीच्या घटना पूर्वीपेक्षा वारंवार येत आहेत.

  • तेजतत्त्वाच्या असंतुलनामुळे उष्णेतत वाढ

तापमान अभूतपूर्व वेगाने वाढत आहे. अनेक ठिकाणी तापमान ५०-६० अंश सेल्सिअसहून अधिक होत आहे. मोठ्या प्रमाणावर वणवे लागत आहेत, जे आपोआप आणि वेगाने पसरत आहेत. या वणव्यांमुळे जागतिक तापमानवाढ वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील आप (जल) आणि वायु यांचे संतुलन बिघडत आहे.

  • वायुतत्त्वाच्या असंतुलनामुळे वातावरणात अस्थिरता

चक्रीवादळे आणि वादळे यांची संख्या अन् तीव्रता वाढत आहे. वार्‍याचा वेग आणि दाब यांतील असंतुलनामुळे वातावरण अस्थिर होत आहे. अतिशय तीव्र धुळीच्या वादळांमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत होत आहे.

  • आकाशतत्त्वाचे असंतुलन

सूर्याच्या प्रखरतेत असामान्य वाढ होत आहे. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. ग्रहांच्या कक्षांमधील अडथळ्यांमुळे हवामान आणि वातावरण यांच्या परिवर्तनाची तीव्रता वाढत आहे. सौर वादळांच्या वाढत्या तीव्रतेमुळे वीज आणि दळणवळण प्रणालींवर परिणाम होत आहे. हवामानाच्या पालटामुळे उत्तर ध्रुवावरील हिमनग वेगाने वितळत आहेत. हवामान पालटाचा हिमालयावरही गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे त्या प्रदेशातील तापमान वाढून वेगाने बर्फ वितळत आहे.

– प.पू. पंडित काशीनाथ मिश्र, ओडिशा

नैसर्गिक आपत्ती आणि हवामान परिवर्तन यांचा अभूतपूर्व वाढता वेग…

फ्रान्समध्ये यंदाच्या वर्षी वाढलेली उष्णता आणि त्यामुळे नागरिकांची झालेली अवस्था
व्हेनेझुएला येथे जून २०२६ मध्ये झालेला भूकंप आणि त्यामुळे झालेली हानी
स्पेनमधील लिओनजवळील ‘टॉर्नेरोस दे जामुझ’ येथे पेटलेला वणवा

सध्या घडणार्‍या घटना यापूर्वी इतक्या तीव्र आणि व्यापक कधीच नव्हत्या. नैसर्गिक आपत्ती पूर्वी एकाच प्रदेशापुरत्या मर्यादित होत्या; पण आज त्या जागतिक स्तरावर अनुभवल्या जात आहेत. हवामानातील असंतुलन अत्यंत टोकाच्या पातळीवर पोचले आहे. शास्त्रज्ञांनी या अनुमानांना दुजोरा दिला आहे की, पृथ्वीवरील हवामान परिवर्तनाचा वेग अभूतपूर्व दराने वाढत आहे. भौगोलिक पालट पूर्वीहून अधिक तीव्र आणि विनाशकारी झाले आहेत. सौर वादळे आणि ग्रहांची हालचाल स्पष्टपणे दर्शवतात की, हे केवळ एक सामान्य नैसर्गिक चक्र नाही, तर एक जागतिक परिवर्तन आहे. युग परिवर्तनात दैवी हस्तक्षेप आवश्यक आहे.

 जलप्रलयामुळे अनेक देशांतील मानवजातीचा विनाश

भगवान प्रलयाच्या माध्यमातून जगातील म्लेच्छांचा (दुष्प्रवृत्तींचा) प्रचंड विनाश घडवून आणतील. याविषयी ‘कलि कल्प गीता’ या ग्रंथात म्हटले आहे,

‘पूरुब दिगरु सागर बढिब, दक्षिणे करिब गादि ।

होइब लहड़ि पड़भिब मारि बड़ देउड़ को भेदि ।’

अर्थ : पूर्व दिशेचा समुद्र खवळेल आणि दक्षिणेकडील देश पाण्यात बुडतील. त्याच वेळी श्री जगन्नाथ धामच्या दिशेने समुद्राच्या लाटा येतील आणि त्या श्री जगन्नाथ महाप्रभूंच्या मुख्य मंदिराला धडकतील.

महापुरुष अच्युतानंद लिहितात की,

‘समुद्र लहड़ि मारि पड़िबटि, पाप भारा हेब जहुं ।

बड़ पंडा बड़ देउड़ आसिण, बंदान करिब सेहूं ।’

अर्थ : मानवांनी केलेल्या पापांमुळे समुद्र हा किनारे ओलांडून संपूर्ण जगाची प्रचंड हानी करील. त्यामुळे समुद्र जगन्नाथाच्या मुख्य मंदिरापर्यंत पोचेल आणि त्या वेळी सेवेत असलेला जगन्नाथ मंदिराचा मुख्य सेवक समुद्रदेवाची आरती करील.

याविषयी महापुरुष अच्युतानंद लिहितात,

‘प्रभु आज्ञांकृत केहि मेंटि नाहीं जलनिधि के मेंटिब ।

बेलके बाहुड़ि जिब जल निधि हरि नाम ऊछुलिब ।’

अर्थ : जेव्हा जगन्नाथ मंदिराचा मुख्य सेवक समुद्रदेवाची आरती करील, तेव्हा समुद्रदेव आपल्या मूळ जागेवर परत जाईल.

पुन्हा महापुरुष लिहितात,

‘आऊ बारेक आसिब जल निधि देउड़ कु धक्का देब ।

प्रभु कोप हेबे चक्रकु धारिवे म्लेच्छ संहार करिबे ।’

अर्थ : समुद्र ३ वेळा किनारा ओलांडून जगात मोठा महाप्रलय घडवून आणेल. त्यापूर्वी तो अनेक वेळा किनारा ओलांडून किनारपट्टीवरील देशांचा नाश करील.

मग तो महान पुरुष म्हणाला,

‘पुरुवरु लुड़ां माड़ि आसुथिब बाईस पहाच्छे मीन ।

रत्न सिंहासने बरुण देवता नधिबे चक्का नयन ।’

अर्थ : पूर्वेकडून समुद्र येऊन जगन्नाथ मंदिराला जलमय करील आणि मंदिराच्या २२ पायर्‍यांवर मासे खेळतील. त्याच वेळी भगवान संपूर्ण जगात संहाराची लीला करतील आणि जलदेवता वरुणदेव रत्न सिंहासनावर विराजमान होतील.

(संदर्भ : ग्रंथ ‘शिवकल्प’)

महापुरुष अच्युतानंद दास म्हणतात,

‘अद्भूत सागर हेब बलियार छुइब पर्वत शिख ।

भक्तक लीला हेब अनर्गल रितु पक्षे मन रख ।’

अर्थ : समुद्रात अचानक सुनामी येईल आणि विशाल पर्वतांना जलमय करतील. त्याच वेळी भगवंताच्या भक्तांची लीला आणि संख्या जगभरात मोठ्या प्रमाणात वाढेल.

‘कलिंग ए भुई बिरजा मंडल उतुपात हेब भारी ।

उतुपात कथा कर्ण रे पड़िले अंग जीव मूर्छ्चा पड़ी ।’

अर्थ : महाप्रलयामुळे असा विनाश होईल, जो यापूर्वी कोणत्याही मनुष्याने पाहिला नसेल. विनाश इतका मोठा असेल की, जो कुणी त्याला डोळ्यांनी पाहील, तो बेशुद्ध होईल.

उत्तर भागातील पर्वताच्या वितळण्यामुळे दक्षिण भागातील देश महाप्रलयाच्या कवेत येतील. त्यामुळे जगातील प्रत्येक देशात जलप्रलय होईल. नद्यांना असा पूर येईल, जो इतिहासात कुणी पाहिला नसेल. अंचल येथे पावसाच्या जलप्रलयामुळे घर, संपत्ती आणि मनुष्य यांसाठी विनाशकारी परिस्थिती निर्माण होईल. पर्वतांचे मुख्य भाग तुटतील आणि जगभरात भयंकर विनाश होईल. कुठे नद्यांमुळे, कुठे पावसामुळे, कुठे वादळांमुळे, तर कुठे सुनामीमुळे प्रचंड जलप्रलय येईल.

– प.पू. पंडित काशीनाथ मिश्र, ओडिशा


‘भविष्य मालिका पुराण’ ग्रंथाचे भाकीत वर्ष २०३२ पूर्वी सनातन धर्माची स्थापना होणार !

‘भविष्य मालिका पुराण’ या ग्रंथाचे मुखपृष्ठ

‘आजपासून ६०० वर्षांपूर्वी १५ व्या शतकात धर्मप्रसार करण्यासाठी भगवान चैतन्य महाप्रभु यांनी अवतार धारण केला. त्याच वेळी त्यांचे शिष्य म्हणून महापुरुष अच्युतानंद दास, महापुरुष बलराम दास, महापुरुष जगन्नाथ दास, महापुरुष जसवंत दास आणि महापुरुष शिशु अनंत दास यांनी (पंचसख्यांनी) उत्कलच्या (ओडिशा राज्य) पवित्र भूमीवर अवतरले.  भगवान जगन्नाथाच्या निर्देशानुसार या पंचसख्यांनी ‘भविष्य पुराण’ ग्रंथाचे पुनरावलोकन (संशोधित) करून ‘भविष्य मालिका पुराण’ ग्रंथाची रचना केली. या क्रमात त्यांनी उडिया भाषेत ताडपत्रांवर १ लाख ८५ सहस्र ग्रंथांच्या समुहाची रचना केली. ‘भविष्य मालिका पुराण’ या ग्रंथात कलियुगाच्या शेवटी धर्माची स्थिती, भगवान श्री कल्कीचा पृथ्वीवरील अवतार, खंडप्रलय, अग्नीप्रलय, जलप्रलय, भूकंप, रोगराई, धर्मसंस्थापना आणि अणूयुद्धात्मक तिसर्‍या महायुद्धापासून अनंत, म्हणजेच आद्य सत्ययुगाच्या आगमनापर्यंतचे संपूर्ण वर्णन करण्यात आले आहे. ‘भविष्य मालिका पुराण’नुसार वर्ष २०३२ पूर्वी जगभरातील सर्व धर्म आणि पंथ यांची पुनर्रचना होऊन संपूर्ण जगात केवळ सनातन धर्माची स्थापना होईल.

(साभार : ‘भविष्य मालिका पुराण : २०३२ से सत्ययुग की शुरुवात’ भाग-१)

कलियुगातील प्रगत यंत्रयुगाचा अंत

‘परम गुप्त मालिका’ या ग्रंथात लिहिले आहे की,

‘वैज्ञानिक जंत्र मान अचल होइब । हरिक चक्र खालि घुरुण जे थिब ।’

अर्थ : अशी वेळ येईल, जेव्हा भगवंताच्या शक्तीसमोर संपूर्ण जगाचे प्रगत तंत्रज्ञान अचल होईल. भगवंताच्या इच्छेप्रमाणे संपूर्ण जगात जे घडायचे, ते घडेल.

पंचशाखांमध्ये लिहिले आहे,

‘लेखा जंत्र मान उलटि पड़िब पढ़ा ज्ञानी हेवे वणा ।

मंग मंगुआल बोल न मानिबे ज्ञान कहि अकलना ।’

अर्थ : सर्व संगणकप्रणाली अचल होतील आणि ज्या शास्त्रज्ञांनी संगणक निर्माण केले, त्यांनाही त्यांची रहस्ये समजणार नाहीत, अशी वेळ येत आहे.

युगप्रवर्तक परिवर्तनाची चाहूल

सनातन धर्मानुसार जेव्हा युग परिवर्तन होते, तेव्हा देव स्वतः अवतार घेऊन धर्माची पुनर्स्थापना करतात. वर्ष २०१२ मध्ये भगवंताच्या अवताराविषयी फारशी चर्चा होत नव्हती; पण आज संपूर्ण जगात भगवंताच्या अवताराविषयी चर्चा होत आहे. जेव्हा अधर्म परमोच्च बिंदू गाठतो, तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि भक्ताचे रक्षण करण्यासाठी देव अवतार घेतो. भगवान श्रीकृष्णाने ‘भगवद्गीते’त म्हटले आहे, ‘जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन.’ सध्या धर्माच्या पुनर्स्थापनेची वेळ जवळ आल्याचे दर्शवणारे दिव्य अनुभव येत आहेत. आज ‘सुधर्म महा महासंघ’सारख्या अनेक संघटना सनातन धर्माच्या पुनरुज्जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. – प.पू. मिश्र

आपण सत्ययुगाकडे वाटचाल करत आहोत का ?

अ. जागतिक स्तरावर सनातन धर्माविषयीची जागरूकता वाढत आहे.

आ. दिव्य अनुभूती आणि धार्मिक पुनर्जागरण वेगाने होत आहे.

इ. जगात धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष चरम शिगेला पोचला आहे.

ई. सर्व चिन्हे स्पष्टपणे दर्शवत आहेत की, युग परिवर्तन त्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

असे असले, तरी आता धर्मसंस्थापनेची वेळ आली आहे. यापुढे अधर्माचे रक्षण होणार नाही आणि जगातील पापी लोकांची या महाविनाशातून सुटका होणे कठीण आहे. त्यामुळे त्रिकाल संध्या, ‘श्रीमद्भागवत महापुराण’ पठण आणि माधवाच्या (श्रीविष्णूच्या) नावाचा, म्हणजेच देवतेचा नामजप करणे, हा संरक्षणाचा एकमेव मार्ग असेल.’

– प.पू. पंडित काशीनाथ मिश्र, ओडिशा
(साभार : ‘भविष्य मालिका पुराण : कल्की अवतार आणि धर्म संस्थापना’)