
पंढरपूर – पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक येत आहेत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘श्रीं’चा प्रसाद म्हणून मंदिर समितीच्या वतीने ११ लाख बुंदी लाडू प्रसाद आणि ७५ सहस्र राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. यात बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती मंदिरे समितीच्या वतीने करण्यात येत असून राजगिरा लाडू प्रसाद बाहेरून खरेदी करण्यात येत आहे, अशी माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
व्यवस्थापक प्रवीणकुमार घम म्हणाले, ‘‘भाविकांसाठी ७० ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू प्रतिपाकीट २० रुपये दराने, तसेच २५ ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू प्रतिपाकीट १० रुपये दराने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या लाडूमध्ये हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाईंड तेल, काजू, बेदाणे, वेलची आदी दर्जेदार साहित्याचा वापर केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असून लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेद्वारे पडताळणी करून तो खाण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. हा प्रसाद सिद्ध करण्याठी अनुमाने ११० कर्मचारी आणि स्वयंसेवक २४ घंटे भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत.’’
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !