आषाढी वारी मार्गावर महाअन्नदान सेवेत सहभागासाठी आवाहन !

नगर – आषाढी एकादशीच्या पायी वारी सोहळ्यासाठी पंढरपूरला जाण्यासाठी निघालेल्या दिंड्या आणि वारकर्‍यांना महाअन्नदान करण्याच्या सेवेत सहभागी व्हा, असे आवाहन श्री. मिलिंद चवंडके यांनी केले आहे. महाअन्नदान सेवेचे हे २१ वे वर्ष आहे. नगर शहरामधून मार्गस्थ होणार्‍या छोट्या दिंड्यांमधील वारकरी बंधू-भगिनींना भोजनासाठी साहित्य पुरवण्याची सेवा श्री. मिलिंद चवंडके गेल्या २० वर्षांपासून श्रद्धेने विनाखंड करत आहेत.

आषाढी वारीच्या महाअन्नदान सेवेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या शहरातील भाविकांनी आपल्या इच्छेनुसार साखर, गूळ, चहापत्ती, दूध, साबुदाणा, तांदूळ, गव्हाचे पीठ, बेसन पीठ, तूरडाळ, मुगडाळ, भाजीचे मसाले, शेंगदाणा तेल, बटाटा वेफर्स, राजगिरा लाडू, रवा, पोहे, अंगाचे आणि कपड्यांचे साबण, असे अत्यावश्यक साहित्य स्वयंस्फूर्तीने ९४२२४९५२८९ या भ्रमणध्वनीवर संपर्क करून पोच करावे, असे आवाहन श्री. मिलिंद चवंडके यांनी केले आहे.