डॉ. विवेकशील अग्रवाल यांचा परिचय
देहली येथील डॉ. विवेकशील अग्रवाल हे ‘श्री परसराम ग्रुप’या ‘स्टॉक ब्रोकिंग कंपनी’चे मालक आहेत. त्यांनी १ सहस्रहून अधिक लोकांना निःशुल्क आयुर्वेदाची औषधे देऊन बरे केले. गेली ३५ वर्षे व्यवसाय केल्यानंतर त्यांनी आता त्यांचे आयुष्य धर्मरक्षणाच्या कार्यासाठी समर्पित करण्याचे ठरवले आहे.

१. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाने हिंदूंमध्ये जागृती
‘वर्ष १९७२-१९७३ मध्ये मी १० वर्षांचा असेल. त्या वेळी माझे वडील ‘हिंदु जागो, देश बचाओ’ (हिंदूंनो जागे व्हा, देश वाचवा), अशा घोषणा लिहिलेली पत्रके छापायचे. त्यासाठी पुष्कळ व्यय यायचा. त्यामुळे ते वर्तमानपत्रांवर मोठ्या ठळक अक्षरांमध्ये या घोषणा छापून रस्त्याच्या बाजूने लावत असत. आजपासून ३०-४० वर्षांपूर्वी कुणीतरी यावे आणि हिंदुत्वाच्या विषयावर बोलावे, यासाठी आम्ही आतूर असायचो. वर्ष १९९० च्या दशकात काश्मिरी हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले; पण त्यांच्याविषयी विशेष बातम्या प्रसिद्ध झाल्या नाहीत आणि चर्चाही झाल्या नाहीत. आता त्यावर निघालेला ‘द कश्मीर फाईल’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला, तर लव्ह जिहादवर आधारित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक व्यवसाय केला. आज सगळीकडे हिंदुत्वाविषयी चर्चासत्रे होत आहेत. हे या ५० वर्षांत झालेले परिवर्तन आहेत.
२. हिंदूंसाठी अमृतकाळ कि विषारी काळ ?
हिंदूंचा शत्रू एवढा प्रभावी झाला आहे की, आपल्या जागृतीचा काही परिणाम दिसत नाही. वर्ष १९४७ मध्ये फाळणीच्या २० वर्षांपूर्वी जशी भयावह स्थिती होती, त्याहून भयावह स्थिती आज भारतात दिसत आहे. भारतातील अनेक ठिकाणांहून सहस्रो हिंदू पलायन करत आहेत. केवळ देहलीतील ५० ठिकाणांहून हिंदूंनी घरदार सोडून पलायन केले. हिंदूंची मुले संस्कारहीन आणि धर्महीन झाली आहेत. ‘ऑनलाईन’ खेळाच्या माध्यमातून हिंदु मुलांना अडकवून मुसलमान बनवले जात आहे. हिंदु मुलींना मुसलमान गुंड छळत आहेत आणि त्यांचे धर्मांतर करत आहेत. ‘हा अमृतकाळ नसून विषारी काळ बनत चालला आहे.’ धर्मांधांची वर्ष २०४७ ची, म्हणजे भारताला इस्लामीस्तान बनवण्याची सिद्धता पूर्ण झाली आहे आणि ते आपल्याच जिल्ह्यांमध्ये काम करत आहेत.
पोलिसांकडे एक सूचना प्रणाली असते. त्या माध्यमातून त्यांना गुप्त सूचना मिळत असतात. पोलिसांना आता धर्मांध मोहल्ल्यांतून कोणत्याही सूचना मिळत नाहीत. देहलीच्या दंगलीत धर्मांधांनी हिंदूंची प्रचंड हानी केली; पण सरकारकडून ८० टक्के हानीभरपाई धर्मांधांनाच मिळाली आणि आपले हिंदु युवक कारागृहात बंद आहेत. त्यांना साहाय्य मिळत नाही; पण धर्मांधांच्या बचावासाठी अधिवक्त्यांची फौज उभी रहाते. त्यांची कमालीची ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) कार्यरत आहे. एकदा मला विमान प्रवासात एका नियतकालिकामध्ये देहली येथे झालेल्या दंगलीत हिंदूंनी मुसलमान घरांवर कशी आक्रमणे केली, याविषयी ३ खोट्या कथानकांचे लेख आढळले. अशा प्रकारे त्यांची ‘इकोसिस्टम’ सिद्ध असते. त्यामुळे आता काही हिंदूंचे शिरच्छेद केले, तरी कुणी हिंदु बोलण्याचे धाडसच करत नाही.
३. हिंदूंच्या सुरक्षेसाठी ‘हिंदु हेल्पलाईन’ (हिंदूंच्या सुरक्षेविषयीची यंत्रणा) आवश्यक !

सध्या परिस्थिती इतकी भयावह झाली आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करत आहेत, तरीही ‘भविष्यात भारतातील अधिकांश भूभागामध्ये हिंदू सुरक्षित राहू शकतील का ?’, हा प्रश्नच आहे. धर्मांध नियोजनबद्ध काम करत आहेत; पण भविष्यासाठी आपण एकही रणनीती किंवा योजना बनवलेली नाही.
त्यामुळे सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा एकत्रित असा ‘हिंदु तज्ञांचा बौद्धिक किंवा वैचारिक गट’ (हिंदु थिंक टँक) असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून विचारांची देवाणघेवाण करता येईल. यासमवेतच त्यांचा एक माहितीकोश (डाटा बेस) निर्माण करण्यात यावा. त्या माध्यमातून एकमेकांशी सहजपणे संपर्क करता येईल आणि धर्मावरील आघाताच्या विरोधात एकसंघपणे आवाज उठवता येईल. यासमवेत एक ‘हिंदु हेल्पलाईन’ निर्माण व्हायला हवी. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ निर्माण होईल. संपूर्ण भारतात कुठेही समस्या निर्माण झाली, तर या गटाने त्याविषयीची सूचना सर्वप्रथम ‘हिंदु थिंक टँक’कडे येईल आणि तेथून सर्वत्र िहंदु कार्यकर्त्यांकडे जाईल. अशा प्रकारे एकत्रितपणे कार्य केल्यास भविष्यात हिंदूंचे रक्षण करणे सोपे होईल.’
– डॉ. विवेकशील अग्रवाल, देहली
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !