पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !

समस्त हिंदु आघाडीची कठोर कारवाईची मागणी !  

पुणे – येथील येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या पक्षपाती आणि हिंदुविरोधी वर्तनाविषयी ‘समस्त हिंदु आघाडी’चे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांनी पोलीस उपायुक्तांकडे लेखी पत्राद्वारे गंभीर आरोप करत त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अंजुम बागवान हे पोलीस ठाण्यात हिंदु-मुसलमान असा उघड भेदभाव करत असून धर्मांध गुंड आणि भू माफिया यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पत्रात केला आहे, तसेच अंजुम बागवान यांच्यावर तात्काळ निलंबनाची आणि कायदेशीर कठोर कारवाईची मागणी समस्त हिंदु आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

पत्रातील मुख्य आणि गंभीर आरोप

१. नागपूर चाळ येथील विनयभंग पीडित हिंदु महिला आणि तिच्या आईला अबिद शेख अन साहिल शेख यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी साहाय्य करणारे अनिरुद्ध लष्करे आणि विक्रमसिंह राजपूत या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवरच अंजुम बागवान यांनी खोटा गुन्हा नोंदवला. यासाठी रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यात धर्मांध गुंडांसमवेत कट रचण्यात आला. विनयभंग पीडित मायलेकी आणि त्यांना सहकार्य करणारे यांना मानसिक त्रास दिला.

२. श्री. विठ्ठल जिवडे या हिंदु व्यक्तीला धर्मांध मुसलमानांनी बेल्ट आणि दांडक्याने बेदम मारहाण करून ‘मुसलमान होण्याचा’ आग्रह धरला होता. या प्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यास बागवान यांनी स्पष्ट नकार दिला, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या श्री. गडकरी या हिंदु व्यक्तीला ‘पोक्सो’चा खोटा गुन्हा नोंद करण्याची धमकी दिली. सध्या गडकरी बेपत्ता आहेत.

३. शिवजयंतीच्या दिवशी फटाके वाजवल्याच्या कारणावरून बागवान यांनी स्वतः धावत जाऊन एका हिंदु मुलाच्या हातातील फटाके हिसकावून घेत त्याला अर्वाच्य शिवीगाळ केली. हे कृत्य त्यांच्या मनातील शिवरायांविषयीच्या द्वेषभावनेचे प्रतीक आहे.

लव्ह जिहाद आणि अमली पदार्थांची तस्करी यांना मुभा !

कल्याणीनगर आणि परिसरातील ‘आयटी पार्क’मध्ये सातत्याने ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडत असून शांतीरक्षक सोसायटी अन इतर परिसरात धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंचे खच्चीकरण चालू आहे, तसेच कल्याणीनगर येथील पबमधून होणार्‍या अमली पदार्थ विक्रीला आणि रात्रभर चालू असणार्‍या धर्मांध मुसलमानांच्या अवैध हॉटेल्सना बागवान यांचे अभय लाभले आहे.

पदोन्नती नाकारून येरवड्यातच रहाण्याचा हट्ट !

अंजुम बागवान यांची पदोन्नती झाली असूनही त्यांनी ती नाकारली आहे; कारण त्यांना येरवड्यातच राहून देशद्रोही प्रवृत्तींना खतपाणी घालायचे आहे, असाही गंभीर आरोप पत्रात केला आहे. पदोन्नती नाकारणार्‍या अधिकार्‍याला कार्यकारी (एक्झिक्युटिव्ह) पद देऊ नये, असा शासन निर्णय आहे; परंतु बागवान यांच्यावरील प्रेमामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी तिकडे दुर्लक्ष केले असावे. बागवान यांचे अनेक अपराध आहेत. त्याविषयी पुरावे आहेत; परंतु जनतेची काळजी वाटत नसल्यामुळे त्यांना वरिष्ठ अधिकारी संरक्षण देत आहेत. ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे.

संपादकीय भूमिका

  • अशी मागणी का करावी लागते ? कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्याऐवजी स्वतःच्या पदाचा अपवापर करून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवायांना खतपाणी घालणारे पोलीस अधिकारी हे समाजाची शांतता बिघडवत आहेत.  याची त्वरित चौकशी होऊन त्यांना कठोर शिक्षा आणि बडतर्फ करणे आवश्यक आहे !
  • अशा हिंदुद्वेषी आणि संशयास्पद वर्तणूक असलेल्या अधिकार्‍याकडे कुणाचेच लक्ष कसे नाही ? याला पाठीशी घालणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे !