दोन लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक गंभीर घायाळ

पनवेल – कामोठे परिसरात एका भटक्या कुत्र्याने १० जणांवर आक्रमण केले. यात दोन लहान मुलांसह ६४ वर्षांचे कृष्णा म्हात्रे गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी नागरिक संतप्त झाले आहेत. परिसरातील मुले नेहमीप्रमाणे खेळत असतांना अचानक रस्त्यावरील कुत्र्याने त्यांच्यावर झडप घातली. मुलांच्या किंकाळ्या ऐकून त्यांना वाचवण्यासाठी कृष्णा म्हात्रे धावले; मात्र कुत्र्याने त्यांच्यावरही आक्रमण केले. त्यांच्या डोळ्याजवळ चावा घेतल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
शिवसेनेचे कामोठे शहरप्रमुख रोकेश गवारी यांनी या घटनेची गंभीर नोंद घेत ‘महानगरपालिकेने विशेष मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवावे’, अशी मागणी केली आहे. (अशी मागणी करण्याची वेळ का येते ? महानगरपालिका स्वतःहून अशी मोहीम का राबवत नाही ? – संपादक)
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !
आषाढी यात्रेसाठी ११ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती ! – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी