अधर्माचा विनाश आणि धर्मसंस्थापनेचा प्रारंभ !
वर्ष २०३२ पूर्वी सनातन धर्माची स्थापना होणार !
‘भविष्य मालिका शास्त्रा’मध्ये तिसर्या महायुद्धाचे ५ शाखांमध्ये सविस्तर वर्णन केले आहे. त्यात तिसरे महायुद्ध केव्हा होईल ? कोणत्या देशांमध्ये होईल ? कोणते देश भारताला सहकार्य करतील? कोणते देश भारताविरुद्ध लढतील ?, युद्धात कोणती शस्त्रे वापरली जातील ? आणि युद्धाचा अंतिम परिणाम काय होईल ? यांविषयी स्पष्ट पुरावे देण्यात आले आहेत. मालिका शास्त्रानुसार ज्या वेळी चीन, पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्ध चालू होईल आणि त्याच युद्धाचे रूपांतर जागतिक युद्धात होईल. याविषयी भविष्यशास्त्र ‘रुक्मिणी गीता’ मध्ये लिहिले आहे,
मीन शनि मेड़गो होइवे जेते बेले ।
सेकाले समर हेब भारत मंडले ।
अर्थ : जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करील, तेव्हा भारत, पाकिस्तान आणि चीन यांच्यात युद्ध चालू होईल. त्याचीच परिणती तिसर्या महायुद्धात होईल.

१. चीन आणि पाकिस्तान यांची भारताविरुद्ध एकत्रित लढाई
‘मालिका शास्त्रा’त लिहिले आहे,
चारि दिगरे चहल पड़िव । चीना संगे आद्य समर हेब ।
चाकिरिया माने फेरस्त जिवे । चोर माने अति प्रबल हेवे ।
दोहा नदी बसे देशे जे । चरण चुटिया भूरिश्रवा सेत ।
जनम असुर देशजे ।

अर्थ : जेव्हा महायुद्धाचा आवाज जगभर घुमेल, त्याच क्षणी भारताचे चीनसमवेत युद्ध चालू होईल. त्या वेळी सरकारी आणि अशासकीय संस्थांमध्ये काम करणार्या लोकांना कामावरून काढले जाईल. टंचाईमुळे जगात चोरी आणि लूटमार मोठ्या प्रमाणात वाढेल. या युद्धात महाभारतातील महान योद्धा ‘भूरिश्रवा’ (कौरवांचा सेनापती, म्हणजेच चुकीचे काम करणारे) हा भारताच्या विरोधात चीनसाठी लढेल.
नंतर महापुरुष शिशु अनंत महाराज यांनी ‘मालिका शास्त्रा’मध्ये लिहिले आहे,
एमंत कालरे कहुछी बाबू रे बुझिजिव लीला भले ।
ए भारत परे चीना देब धाड़ि निश्चय जबन तुले ।
अर्थ : येथे महापुरुष ठामपणे सिद्ध करतात की, ज्याक्षणी चीन भारताशी युद्ध करील, त्याच क्षणी पाकिस्तानही भारतावर युद्ध लादेल आणि दोन्ही देश एकत्र लढतील.
एही भारत रे संगे पाकिस्तान टी लड़िब रंगे । महासमर करीब जाणिंथा देगे । उड़ि जे चीन सैन्य तुरुकि ईरान जाण ब्रिटिश जे । अमेरिका पाकिस्तान कु देबे बल अस्त्र आबर । जोगाई देवे युद्ध लागिव आबर ।
अर्थ : पाकिस्तान आणि चीन मिळून भारताविरुद्ध युद्ध पुकारतील. पाकिस्तानला तुर्कीए, इराण, ब्रिटन, अमेरिका आणि १३ इस्लामी देशांकडून शस्त्रे, सैनिकी अन् आर्थिक साहाय्य मिळेल.
‘भविष्य मालिका पुराण : २०३२ से सत्ययुग की शुरुवात’

‘आजपासून ६०० वर्षांपूर्वी १५ व्या शतकात धर्मप्रसार करण्यासाठी भगवान चैतन्य महाप्रभु यांनी अवतार धारण केला. त्याच वेळी त्यांचे शिष्य म्हणून महापुरुष अच्युतानंद दास, महापुरुष बलराम दास, महापुरुष जगन्नाथ दास, महापुरुष जसवंत दास आणि महापुरुष शिशु अनंत दास उत्कलच्या (ओडिशा राज्य) पवित्र भूमीवर अवतरले. भगवान जगन्नाथांच्या निर्देशानुसार या पंचसख्यांनी ‘भविष्य पुराण’ ग्रंथाचे पुनरावलोकन (संशोधित) करून त्या ग्रंथाची रचना केली. या क्रमात त्यांनी उडिया भाषेत ताडपत्रांवर १ लाख ८५ सहस्र ग्रंथांच्या समुहाची रचना केली. ‘भविष्य मालिका पुराण’ या ग्रंथात कलियुगाच्या शेवटी धर्माची स्थिती, भगवान श्री कल्कीचा पृथ्वीवरील अवतार, धर्मसंस्थापना, मनुष्य समाजाचा उद्धार आणि युगायुगांतील भगवंताच्या लीलांचे सविस्तर वर्णन केले आहे.
‘भविष्य मालिका’ ग्रंथात लिहिलेली प्रत्येक गोष्ट काळ्या दगडावरील रेषा आहे आणि नेहमीच सत्य सिद्ध झाली आहे. जसे की, भारतातील मोगलांचे अत्याचार, ब्रिटिशांची गुलामगिरी, स्वातंत्र्यलढ्यातील घटना आणि स्वातंत्र्यसैनिकांचे वर्णन, भारताची फाळणी होऊन स्वातंत्र्य मिळणे; पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि ब्रह्मदेश (आताचा म्यानमार) यांची निर्मिती, पहिले आणि दुसरे महायुद्ध, अज्ञात रोगांच्या साथींचा संसर्ग इत्यादी सर्व घटना घडलेल्या आहेत. यासमवेतच या ग्रंथामध्ये प्रामुख्याने या पृथ्वीवर भगवान श्री कल्कीचा अवतार, भक्तांचे एकत्रीकरण, सुधर्मा महा महासंघ आणि १६ मंडलांचे गठन, खंडप्रलय, अग्नीप्रलय, जलप्रलय, भूकंप, रोगराई आणि अणुयुद्धात्मक तिसरे महायुद्धापासून अनंत युगाच्या/आद्य सत्ययुगाच्या आगमनापर्यंतचे संपूर्ण वर्णन करण्यात आले आहे. ‘भविष्य मालिका पुराणा’नुसार वर्ष २०३२ पूर्वी संपूर्ण जगभरातील सर्व धर्म आणि पंथ यांची पुनर्रचना होऊन संपूर्ण जगात केवळ सनातन धर्माची स्थापना होईल.
प.पू. पंडित काशीनाथ मिश्र यांच्या ४० वर्षांहून अधिक मालिकांचा अभ्यास आणि अनुमोदन यांमुळे आज जगात प्रथमच ‘भविष्य मालिका पुराण’ या ग्रंथाचा प्रथम खंड हिंदीसह जगातील १५० हून अधिक देशांच्या विविध भाषांमध्ये प्रकाशित केला जात आहे.’
(साभार : ‘भविष्य मालिका पुराण : २०३२ से सत्ययुग की शुरुवात’ भाग-१; प्रकाशन वर्ष २०२३)
२. पाकिस्तान आणि चीन यांच्या विरोधातील युद्धाला भारताला रशियाचा पाठिंबा
अ. ‘आगत भविष्य मालिका शास्त्रा’त लिखाण केल्यानुसार
एहा देखिबे रुसिया आसि होइब ठिया। भारत समर क्षेत्रे सेहि कुटिया ।
अस्त्र शस्त्र सैन्य जोगाई देब जाण । भारत सहित मिसी करिब रण ।
अर्थ : जेव्हा तिसरे महायुद्ध चालू होईल, तेव्हा भारत एका बाजूला असेल आणि चीन, पाकिस्तान, तुर्कीये, अमेरिका, इराण अन् १३ इस्लामी राष्ट्रे दुसर्या बाजूला लढत असतील. त्याच वेळी रशिया भारताला पाठिंबा देईल. रशिया आणि भारत शत्रूच्या सैनिकांविरुद्ध एकत्र येऊन जोरदार लढतील.
आ. ‘मालिका शास्त्रा’मध्ये लिहिले आहे,
प्राच्य पाश्चात्य गण एही परि मिलीण ।
पाकिस्तान लागि सर्वे करीब रण । गोड़ि तोप कमाण
अर्थ : मध्य-पूर्वेकडील सर्व देश, भारताचे सर्व शेजारी देश आणि काही युरोपीय देश हे सर्व पाकिस्तानशी हातमिळवणी करून भारताच्या विरोधात युद्ध करतील, जे काळानुसार जगातील सर्वांत मोठे महायुद्ध असेल.
तिसर्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात ओडिशातील खंडगिरी येथे भगवान कल्की यांच्यासमवेत निर्णायक लढाई होईल.
३. तिसर्या महायुद्धातील निर्णायक देश
‘भविष्य मालिका’ ग्रंथशास्त्रानुसार तिसर्या महायुद्धात भारत, रशिया, जपान, जर्मनी आणि फ्रान्स यांचा एक गट, तर पाकिस्तान, चीन, तुर्कीए, अमेरिका, इराण, इस्लामी देश, ब्रिटन, आफ्रिका आणि इतर देश यांचा दुसरा गट असेल.
तिसर्या महायुद्धाच्या काळात आदिशक्ती योगमाया बिरजादेवीच्या हातात जगाचे नियंत्रण

पंच सखा यांनी ‘मालिका शास्त्र’मध्ये लिहिले,
राजा होई केही रहिबे नाही । बिरजा शासन होइब मही ।
तेरसौ छप्पन दड़े भारते ।
ठिके ठिके राम कहिलि तोते ।
अर्थ : जेव्हा तिसरे महायुद्ध होईल, तेव्हा कोणत्याही देशाची क्षमता आणि कोणत्याही देशाचे शासन हे राष्ट्रप्रमुखांच्या नियंत्रणाखाली रहाणार नाही. प्रत्यक्षात ते आदिशक्ती योगमाया माता बिरजादेवीच्या (जयपूर) हातात असेल, जी ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे.
‘मालिका शास्त्रा’नुसार मीन राशीतील शनीच्या भ्रमणानंतर शेअर (समभाग) विक्री बाजाराची स्थिती खालावत जाईल आणि महागाई पुष्कळ वरच्या स्तराला जाईल.
– प.पू. पंडित काशीनाथ मिश्र, ओडिशा
४. तिसर्या महायुद्धापूर्वी जागतिक आर्थिक मंदी
तिसरे महायुद्ध चालू होण्यापूर्वी संपूर्ण जगात आर्थिक मंदीसारखी स्थिती निर्माण होईल. महायुद्धातील हानीकारक शस्त्रांच्या वापरामुळे शेती नष्ट होईल. त्यामुळे अन्न मिळवणे, हे प्रत्येकासाठी एक आव्हान बनेल. यासंदर्भात पंचसख्यांनी ‘मालिका शास्त्रा’मध्ये लिहिले आहे. त्याचप्रमाणे महापुरुष शिशु अनंत महाराजांनीही ‘पट्टा मडाण’ या ग्रंथात आर्थिक परिस्थितीचे सविस्तर वर्णन खालीलप्रमाणे केले आहे,
रंग ढंग आऊ रहिब नाहीं ।
अर्थ : जगातील कोणत्याही मनुष्याला सुख आणि शांती मिळणार नाही. गरीब आणि श्रीमंत सर्वजण समान होतील. जगातील सर्व लोक संपत्ती, सौंदर्य आणि वैभव यांपासून वंचित होतील.
टंका सुना परे श्वान मुतुथीब, श्वान न होइबे नाश ।
कहंति अनंत ब्रह्म ज्ञान बाणि सुणे थिबे ब्रज सुत ।
अर्थ : तिसरे महायुद्ध चालू होईल, तेव्हा सोने आणि पैसा यांना काहीही मूल्य रहाणार नाही. त्यावर कुत्रे मूत्रविसर्जन करतील. याचा अर्थ असा की, जगभरात महागाई इतकी वाढेल की, प्रचलित चलनाला काहीही मूल्य रहाणार नाही.
महापुरुष अच्युतानंद महाराजांनी पुढे लिहिले,
‘उबा धन मान राजा हरिनेबे, पोता हरिबे बासुकी ।
बड़ा बड़िया जे केहि न रहिबे, हेतु कर राम ।’
अर्थ : महायुद्धानंतर काही दिवसांनी जगभर आर्थिक आणीबाणीची स्थिती घोषित केली जाईल. त्यामुळे जगात कुणीही लहान-मोठे शिल्लक रहाणार नाही आणि सर्वजण समान होतील. पृथ्वीवरील सर्व संपत्ती भूकंप, पूर आणि पंचमहाभूते यांच्या विनाशकारी प्रलयात नष्ट होईल. त्यामुळे कुणामध्येही अहंकार रहाणार नाही; कारण कुणाकडेही सौंदर्य, घर, संपत्ती किंवा मालमत्ता रहाणार नाही. सर्व अस्ताव्यस्त होईल. त्यामुळे अशा प्रतिकूल काळात मानवी सभ्यतेकडे धर्ममार्ग आणि ईश्वराची साधना हीच मोठी संपत्ती आहे. घर, वैभव आणि संपत्ती यांसाठी मनुष्य गर्व करतो, ते सर्व धुळीत मिसळेल.
५. वर्ष २०१२ मध्ये कलियुग का संपले नाही ?
वैज्ञानिक दृष्टीकोनातून वर्ष २०१२ हे मोठ्या परिवर्तनाचे वर्ष होते; परंतु मालिका शास्त्रानुसार वर्ष २०१२ मध्ये युगपरिवर्तन आणि धर्मसंस्थापनेची वेळ झालेली नव्हती. त्यामुळे ईश्वराने ती प्रतिकूल वेळ टाळून भक्त आणि मानव समाज यांचे रक्षण केले.
६. युग परिवर्तन आणि तिसरे महायुद्ध यांची शक्यता
त्रेतायुगात प्रभु श्रीरामाने रावणाशी महायुद्ध करून अधर्माचा अंत केला आणि धर्माची संस्थापना केली. द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णानेही महाभारत युद्धाच्या माध्यमातून धर्माचे राज्य पुन्हा स्थापित केले. कलियुगाच्या शेवटीही एक महायुद्ध (तिसरे महायुद्ध) होईल. ज्यात अधर्माचा पूर्णपणे नाश होईल आणि सत्य सनातन धर्माची स्थापना होईल.
– प.पू. पंडित काशीनाथ मिश्र, ओडिशा
(साभार : ‘भविष्य मालिका पुराण : कल्की अवतार आणि धर्म संस्थापना’)
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !