
पंढरपूर – आषाढी यात्रेचा कालावधी १५ ते २९ जुलै असा आहे. या कालावधीत भाविकांना दर्शन घेणे सुलभ जावे, यासाठी १६ जुलै या दिवशी श्रींचा पलंग काढून २४ घंटे दर्शनव्यवस्था चालू करण्यात येणार आहे. हे दर्शन ३ ऑगस्टपर्यंत चालू राहील, अशी माहिती ‘विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’चे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आषाढ शुक्ल एकादशीला पहाटे २.२० वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीची शासकीय महापूजा पार पडणार आहे. भाविकांच्या सुविधेसाठी दर्शनरांग व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यात आले असून श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपातील ८ गाळ्यांपैकी २ गाळ्यांचा वापर करण्यात येणार आहे. दर्शनरांगेत शुद्ध पिण्याचे पाणी, चहा, खिचडी वाटप, जल शीतयंत्रे, भक्तीगीते, थेट दर्शन, हिरकणी कक्ष, ४ ते ५ विश्रांती कक्ष, हरवले-सापडले विभाग, अन्नछत्र, सार्वजनिक सूचना प्रणाली, स्वच्छतागृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अतीदक्षता विभाग, चौकशी कक्ष, अग्नीशमन वाहने, रुग्णवाहिका आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध असतील.
यात्रेच्या कालावधीत २ सहस्र ५०० कर्मचार्यांची नियुक्ती !
यात्रेच्या कालावधीत २ सहस्र ५०० कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून श्री संत तुकाराम भवन येथे तहसीलदार दर्जाच्या अधिकार्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. महिला भाविकांसाठी कपडे पालटण्यासाठी २५ खोल्या आणि ६ हिरकणी कक्ष महिला सुरक्षा कर्मचार्यांसह उपलब्ध रहाणार आहेत.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !