चोर्या रोखण्यासाठी प्रवाशांना होणार थेट अटक
नवी देहली – भारतीय रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट (घोंगडी) आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. या समस्येमुळे रेल्वेला होणारी कोट्यवधी रुपयांची हानी पहाता आता रेल्वे मंत्रालयाने अत्यंत आक्रमक आणि कडक पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. रेल्वे अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार या चोर्यांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षादलाला चोरांना जागेवरच अटक करण्याचे अधिकार देण्यावरही विचार चालू आहे.
Rise in Thefts of Bedsheets, Blankets, and Towels from Air-Conditioned Railway Coaches
Passengers found stealing these items will henceforth face immediate arrest.
Such incidents reflect a decline in ethical values in society and underscore the need to promote moral education… pic.twitter.com/Gonf3alArJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 15, 2026
१. रेल्वेच्या माहितीनुसार कोरोना महामारीच्या काळानंतर जानेवारी २०२२ मध्ये ‘बेडरोल’ (चादरी, ब्लँकेट आणि टॉवेल्स) सेवा पुन्हा चालू करण्यात आली होती. त्यानंतर मे २०२६ पर्यंत म्हणजेच अवघ्या ४ वर्षे ३ महिन्यांत रेल्वेच्या १६ झोनमधून एकूण १ कोटी २७ लाख रुपये किमतीचे ‘बेडरोल’ चोरीला गेले आहेत.
२. या चोर्या कायमच्या थांबवण्यासाठी रेल्वेच्या चादरी, टॉवेल्स आणि ब्लँकेट यांवर आता अत्यंत बारीक ‘आर.एफ्.आय.डी.’ (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) चिप्स लावल्या जातील. यासोबतच रेल्वे डब्यांच्या ‘एक्झिट गेट’वर न दिसणारे ‘डिजिटल सेन्सर्स’ बसवले जातील. कुणी प्रवासी रेल्वेची चादर किंवा टॉवेल बॅगेत टाकून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल, तर हे ‘सेन्सर्स’ लगेच सूचना देतील.
३. प्रवाशांनी रेल्वेगाड्यांमधून उतरण्याच्या किमान ३० मिनिटे आधी त्यांचे ‘बेडरोल’ कर्मचार्यांकडे सुपुर्द करावेत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
४. तसेच चोरी रोखण्यासाठी सध्या डब्यांमध्ये तैनात असलेल्या रेल्वे कर्मचार्यांना अधिक सतर्क रहाण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती