केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आणि ‘पद्मश्री’प्राप्त आर्.व्ही.एस्. मणी यांनी केला दावा
‘पीपल-टू-पीपल कॉन्टॅक्ट’च्या नावाखाली चालू होती तस्करी
भारतातील पाकपुरस्कृत आतंकवादाला अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळत असे ३० टक्के निधी
(भारत-पाकिस्तान यांच्यातील पीपल-टू-पीपल कॉन्टॅक्ट म्हणजे उभय देशांतील कलाकार, खेळाडू आदींचे येणे-जाणे)
नवी देहली – भारत दौर्यावर आलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघातील अनेक खेळाडू अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी होते. या तस्करीतून निर्माण होणारा पैसा आतंकवादी आक्रमणांसाठी वापरला जात होता, असा खळबळजनक दावा भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयातील माजी अवर सचिव आर्.व्ही.एस्. मणी यांनी केला आहे. मणी यांनी एका मुलाखतीत असा दावा करतांना शोएब अख्तर, महंमद आसिफ, सलीम मलिक, शाहिद आफ्रिदी आणि हसन रझा या क्रिकेटपटूंची नावे घेतली. या कृत्यामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’ असल्याचा आरोपही त्यांनी केला.
वर्ष २०२६ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त मणी यांनी यासंदर्भात एक उदाहरण दिले. ते म्हणाले की, ऑक्टोबर २००६ मध्ये पाकिस्तानच्या उच्चायुक्तांकडे अख्तर आणि आसिफ यांनी भारताच्या दौर्यावर असतांना स्वत:समवेत अमली पदार्थ नेल्याची स्वीकृती दिली होती. त्या वेळी उच्चायुक्तालयाने त्यांना मायदेशी पाठवले. दोघांनी म्हटले होते की, अमली पदार्थ आम्ही वैयक्तिक वापरासाठी नेले होते; परंतु ती केवळ एक चाल किंवा सबब होती. त्यामागील संपूर्ण पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे.
🚨 SHOCKING EXPOSÉ: Drugs, Cricket & Terror Funding 🚨
Former MHA Under Secretary & Padma Shri awardee R.V.S. Mani alleges Pakistani cricketers smuggled narcotics during India tours.
He further alleges narcotics were smuggled under the guise of "people-to-people contact"… https://t.co/gD9IYH23Pf pic.twitter.com/DVVYqlVAFE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 15, 2026
पाकिस्तानी खेळाडू, कवी, लेखक भारताच्या दौर्यावर असतांना करायचे अमली पदार्थांची तस्करी !
मणी म्हणाले की, पाकिस्तानी शिष्टमंडळे अमली पदार्थ आणत असत आणि त्या काळातील गुप्तचर विभागाच्या अनुमानानुसार भारतातील ३० टक्के आतंकवादी आक्रमणांसाठीचा निधी अमली पदार्थांच्या व्यापारातूनच येत असे. भारतात अमली पदार्थ ढकलणे किंवा त्यांची तस्करी करणे, हे पाकिस्तानचे अधिकृत धोरण आहे. म्हणूनच आम्ही म्हणायचो की, जर अफगाणिस्तानमधील जलालाबादमध्ये अफूचे पीक (उत्पादन) चांगले झाले, तर येथे अधिक आक्रमणे होणार. आम्ही तसा अनुमान लावायचो, असे मणी म्हणाले.
| हे ही वाचा → मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani |
मणी पुढे म्हणाले की, पाणीवाटपाच्या वाटाघाटींसाठी येणार्या अधिकृत (राजकीय) शिष्टमंडळांकडून ही तस्करी कधीही होत नसे. तथापि ‘लोकांचा लोकांशी संपर्क’ हा जो प्रकार असायचा, म्हणजे खेळाडू, कवी, लेखक, कलाकार आदींच्या माध्यमातून ही तस्करी होत असे. ‘लोकांचा लोकांशी संपर्क’ हाच सर्वांत मोठा फसवणुकीचा प्रकार होता.



हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !