Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !

कर्नाटकला ‘एआय-नेटिव्ह’ राज्य बनवण्याचा मुख्यमंत्री शिवकुमार यांचा संकल्प !

(एआय म्हणजे आर्टिफिशल इन्टेलिजन्स, म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता. एआय-नेटिव्ह म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित निर्मितीचे केंद्र)

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार

बेंगळुरू (कर्नाटक) – बेंगळुरू येथे आयोजित ‘गूगल आय/ओ कनेक्ट इंडिया २०२६’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी देशातील पहिले सरकारी ‘एआय’ विद्यापीठ चालू करण्याची घोषणा केली.
या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहेत :

१. राज्याचा विकास : कर्नाटकला ‘एआय-नेटिव्ह’ राज्य बनवणे.  राज्याच्या प्रशासन, शिक्षण, आरोग्य आणि शेती या क्षेत्रांत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सेवा सुधारणे

२. वाहतूक कोंडीवर उपाय: बेंगळुरूच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ठोस उपाय शोधणे

३. तंत्रज्ञान केंद्र : ‘एआय’च्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधन, ‘डेटा सेंटर्स’ आणि ‘क्लाउड कंप्युटिंग’ (इंटरनेटच्या माध्यमातून संगणकीय सेवा (उदा. डेटा स्टोरेज, सर्व्हर्स, डेटाबेस, नेटवर्किंग, सॉफ्टवेअर इत्यादी) या पायाभूत सुविधांचा विस्तार करून कर्नाटकाला जागतिक स्तरावर एक भक्कम तंत्रज्ञान हब (केंद्र) म्हणून विकसित करणे.

४. सहयोग: शैक्षणिक संस्था, उद्योग आणि सरकार यांच्या समन्वयातून नवीन पिढीची ‘एआय’ प्रतिभा विकसित करणे, हे सरकारचे ध्येय आहे.