कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे इतिहासात प्रथमच जोतिबा डोंगरावर खेटे भाविकांविना !

कोल्हापूर – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जोतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी असणारे सर्व रस्ते प्रशासनाने २८ फेब्रुवारी या दिवशी बंद केले.

कर्नाटकने अवैधरित्या म्हादईचा जलप्रवाह वळवला आणि कळसा पात्राचे पाणी पहिल्यांदाच सुकले !

म्हादई जलवाटप तंटा लवाद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे प्रविष्ट असतांनाही कर्नाटक राज्य अनधिकृतपणे म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवणे चालूच ठेवत असल्याचे उघड झाले आहे.

कुणकेश्‍वर यात्रा रहित; मात्र नित्योपचार चालू रहाणार ! – पालकमंत्री उदय सामंत

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कुणकेश्‍वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेच्या नियोजनाविषयी देवस्थानच्या विश्‍वस्तांसह पालकमंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी ते बोलत होते.

सांगली येथे काळ्या खणीतून १५ दिवसांत महापालिका कर्मचार्‍यांनी १३ टन कचरा काढला !

सांगली – सांगलीच्या मध्यवर्ती असणारी काळी खण गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली होती.

गुटख्याची पाळेमुळे शोधण्यासाठी संभाजीनगर येथील पोलीस सातारा शहरात तळ ठोकून !

सातारा – संभाजीनगर येथील पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हिरा गुटख्याची वाहतूक करणार्‍या ३ गाड्यांसह ३ आरोपींना कह्यात घेतले होते. या वेळी त्यांच्याकडून गुटख्याची २३ पोती आणि ३ वाहने असा ७ लाखांहून अधिक मुद्देमाल शासनाधीन केला.

४ सहस्र रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी कसाल मंडळ अधिकारी संदीप हांगे निलंबित

लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील कसाल मंडल अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी निलंबित केले आहे. कायदेशीर खरेदी केलेल्या भूमीच्या खरेदी खताची सातबारावर नोंद करण्यासाठी संदीप हांगे यांनी संबंधिताकडे ४ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

संत साहित्याच्या अभ्यासातून मायमराठी जगभरात

संत एकनाथ महाराज यांची शिकवण जगभरात पोचवणार्‍या मिशनचे कार्य अभिनंदनीय आहे. सहस्रो भाविकांनी याचा लाभ करून घेतला आहे, हे कौतुकास्पद आहे. संतांची शिकवणच आदर्श समाज निर्माण करू शकते. यासाठी भाविकांनी याचा अधिकाधिक प्रसार करावा, हीच संतांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता होय.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडून सातारा येथील ‘बोरगाव कृषी विज्ञान केंद्रा’ची पहाणी

महाराष्ट्राचे ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च आणि तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्ह्यातील ‘बोरगाव कृषी विज्ञान केंद्रा’ला भेट देऊन पहाणी केली. तसेच विविध उपक्रमांची माहिती घेऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला.

पथकरमुक्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसही आग्रही ! – शशिकांत शिंदे

जिल्ह्यातील नागरिकांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी निर्णय घेतल्यास पथकरमुक्ती होऊ शकते. याविषयी सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिल्यास त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या दिवशी केवळ कामकाजाची औपचारिकता

जनतेपुढे असंख्य समस्या असतांना त्या सोडवण्यासाठी सभागृहातील प्रत्येक क्षण कसा वापरता येईल, याचा विचार न करता सोयीनुसार कामकाज चालवणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !