राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडून सातारा येथील ‘बोरगाव कृषी विज्ञान केंद्रा’ची पहाणी

महाराष्ट्राचे ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च आणि तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्ह्यातील ‘बोरगाव कृषी विज्ञान केंद्रा’ला भेट देऊन पहाणी केली. तसेच विविध उपक्रमांची माहिती घेऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला.

पथकरमुक्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसही आग्रही ! – शशिकांत शिंदे

जिल्ह्यातील नागरिकांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी निर्णय घेतल्यास पथकरमुक्ती होऊ शकते. याविषयी सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिल्यास त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या दिवशी केवळ कामकाजाची औपचारिकता

जनतेपुढे असंख्य समस्या असतांना त्या सोडवण्यासाठी सभागृहातील प्रत्येक क्षण कसा वापरता येईल, याचा विचार न करता सोयीनुसार कामकाज चालवणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना बजावली वानवडी पोलिसांनी नोटीस !

माजी मंत्री संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्या विरोधात पूजाचा गर्भपात करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीसाठी तृप्ती देसाई आणि पूजाची चुलत आजी म्हणून घेणार्‍या शांताबाई चव्हाण यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते.

आता कृषी क्षेत्रामध्ये खासगी क्षेत्रांचा सहभाग वाढवण्याची वेळ आली आहे ! – पंतप्रधान मोदी

‘आम्ही शेतकर्‍यांना असे पर्याय देऊ की ते गहू आणि तांदूळ यांचे उत्पादन करण्यापुरतेच सीमित रहाणार नाहीत’,

२५० रुपयांत खासगी रुग्णालयांमध्ये मिळणार कोरोनावरील लस !

कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात लस घेण्यास पात्र व्यक्ती खासगी रुग्णालयातून कोरोनाची लस टोचून घेऊ शकतात. त्यासाठी एका डोसचे २५० रुपये शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामध्ये लसीची किंमत १५० रुपये असून १०० रुपये सेवेसाठी आकारण्यात येणार आहेत.

पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी दिल्याचा शांताबाई चव्हाण यांचा आरोप !

पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये पोचवले आहेत. त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्येविषयी बोलायचे नाही, असा आरोप पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई चव्हाण यांनी केला. त्यामुळेच पूजा चव्हाणच्या घटनेत तिचे आई-वडील अद्यापही काही बोलत नाहीत.

विधानसभेत वैधानिक विकास मंडळाच्या निवडीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी !

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात वैधानिक विकास मंडळ सिद्ध करण्याच्या कारणावरून खडाजंगी झाली.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार्‍यांपैकी ४२ जणांना कोरोनाची लागण

१ मार्चपासून चालू झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार्‍यांपैकी ४२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रवेश नाकारण्यात आला आहे.