गुटख्याची पाळेमुळे शोधण्यासाठी संभाजीनगर येथील पोलीस सातारा शहरात तळ ठोकून !

सातारा – संभाजीनगर येथील पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हिरा गुटख्याची वाहतूक करणार्‍या ३ गाड्यांसह ३ आरोपींना कह्यात घेतले होते. या वेळी त्यांच्याकडून गुटख्याची २३ पोती आणि ३ वाहने असा ७ लाखांहून अधिक मुद्देमाल शासनाधीन केला. याच अनुषंगाने हिरा गुटख्याचे व्यापारी सातारा शहरातील निवासी असल्याने संभाजीनगर पोलीस सातारा पोलिसांच्या सहकार्याने या घटनेचा तपास करण्यासाठी सातारा शहरात तळ ठोकून आहेत. अद्याप मुख्य आरोपीपर्यंत पोलिसांना पोचण्यात यश आलेले नाही.

संभाजीनगर पोलिसांनी सातारा शहराबाहेरील गुटखा व्यापार्‍याच्या औद्योगिक वसाहतीमधील आस्थापने आणि रविवार पेठ येथील निवासस्थान या ठिकाणी कसून चौकशी केली. या वेळी आस्थापनातील काही नमुने पोलिसांनी कह्यात घेतले आहेत. संभाजीनगर पोलिसांनी ११ नोव्हेंबर २०२० या दिवशी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करतांना मोईन इसाक शेख, मुस्ताक मुसा शेख आणि वसीम शेख यांना कह्यात घेतले होते.