चीन हवामानात पालट करून भारतात अतीवृष्टी किंवा हिमवृष्टी करण्याच्या प्रयत्नात !

चीन भारतासह अन्य शेजारी देशांना त्रास देण्यासाठी आता नवी योजना आखत आहे. चीन रासायनिक रॉकेटचा आकाशात स्फोट करून हवामानात पालट करण्याच्या प्रयत्नात आहे. याद्वारे कृत्रिमरित्या पाऊस पाडणे अथवा हिमवृष्टी करणे असा प्रयत्न असणार आहे. यामुळे शेजारी देशांमध्ये मोठे पूर आणण्याचा चीनचा प्रयत्न आहे.

मिग-२९ विमान दुर्घटनेतील दुसर्‍या वैमानिकाचा मृतदेह सापडला

आय.एन्.एस्. विक्रमादित्यवरून उड्डाण केल्यानंतर २६ नोव्हेंबर या दिवशी अरबी समुद्रात मिग-२९ हे विमान कोसळले होते. या दुर्घटनेत २ पैकी एका वैमानिकाला वाचवण्यात यश आले होते.

इंडोनेशियामध्ये पोलिसांसमवेत झालेल्या चकमकीत ६ इस्लामी कट्टरतावादी ठार

पोलिसांनी ७ डिसेंबर या दिवशी झालेल्या एका चकमकीमध्ये ६ संशयित कट्टरतावाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

‘भारत बंद’चा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आप यांचा पाठिंबा.
आंदोलनाला पाठिंबा म्हणजे शेतकर्‍यांना लुटणार्‍या दलालांना पाठिंबा !

नव्या संसद भवनाच्या बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

येत्या १० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्‍या नव्या संसद भवनाच्या बांधकामालाच सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे; मात्र भूमीपूजन करण्यास कोणतीही अडचण नाही, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

अमली पदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कॅनाबिसच्या लागवडीमध्ये गोव्यात वाढ

चरस, गांजा आदी अमली पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा प्रमुख घटक म्हणजे ‘कॅनाबिस’ ! या रोपांची लागवड आता गोव्यात केली जात आहे. अशा प्रकारची मागील एका वर्षात ८ प्रकरणेे उघडकीस आली, तर नोव्हेंबर २०२० या एका मासातच ४ प्रकरणे उघडकीस आली आहेत.

आंध्रप्रदेशच्या एलुरू जिल्ह्यामध्ये अज्ञात आजारामुळे एकाचा मृत्यू, तर २९२ जण आजारी

संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी सामना करत असतांना आंध्रप्रदेशच्या एलुरू जिल्ह्यामध्ये एका अज्ञात आजारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे, तर २९२ हून अधिक लोक आजारी पडले आहेत.

सिंधुदुर्गातील कोरोनाविषयीची सद्य:स्थिती

दळणवळण बंदीमध्ये शिथिलता आली, याचा अर्थ कोरोनाचे संकट टळले असे नाही, हे जिल्ह्यात वाढणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवरून लक्षात येते. जनतेने कोरोनाविषयीच्या शासकीय आणि वैद्यकीय नियमांचे पालन करणेच योग्य !

१२ लाख रुपयांची अवैध मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

सातत्याने गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक होत असल्याच्या घटना उघड होत आहेत. पोलिसांनी कारवाई केली, तरीही हे प्रकार चालूच आहेत.

पाकमध्ये मुसलमान तरुणाचा विवाहाचा प्रस्ताव नाकारणार्‍या ख्रिस्ती तरुणीची हत्या

याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि पाकप्रेमी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !