विश्‍व हिंदु परिषद देशातील ४ लाख मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात अभियान राबवणार !

विहिंपचे हे स्तुत्य अभियान आहे. असे असले, तरी केंद्र सरकारने आणि भाजप शासित राज्यांनीच मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी कायदा केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

‘जे आरोप तुम्ही केले आहेत ते गंभीर आहेत यात शंका नाही; मात्र हे प्रकरण एवढे गंभीर होते, तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाहीत ?’ – सर्वोच्च न्यायालय

कुंभमेळ्याला येणार्‍या भाविकांना कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर करावाच लागणार !

कुंभमेळ्यासाठी येणार्‍या भाविकांना कोरोना चाचणी नकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

अयोध्येत श्रीराममंदिराचा पाया खोदतांना सापडल्या मूर्ती आणि चरणपादुका !

सध्या श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिर उभारण्यासाठी भूमीचे सपाटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोदकाम करतांना प्राचीन ‘सीतामाता की रसोई’ मंदिर स्थळी चरणपादुका, चौकट आणि खंडित देवमूर्तींचे अवशेष आढळून आले.

ब्रिटीश काळातील कायदे कालबाह्य ठरवून मंदिरे हिंदूंच्या कह्यात द्या ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, प्रज्ञा भारती, तेलंगाणा

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या राजवटीत ‘एंडोव्हमेंट’ कायदा लागू करून मद्रास प्रांतातील मंदिरांवर एकाधिकारशाही प्रस्थापित करण्यात आली. या अन्वये मंदिरांच्या १ लाख एकर भूमीचे अधिग्रहण केले गेले. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आलेल्या कोणत्याही सरकारने यात पालट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

देशात सर्वाधिक ‘अ‍ॅक्टिव्ह रुग्ण’ असणार्‍या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात !

यात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नांदेड, जळगाव आणि अकोला यांचा समावेश आहे.

राज्याच्या अपयशाविषयी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुख्यमंत्री बोलत नसतील, तर घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी या प्रकरणांविषयी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पर्यावरण रक्षणासाठी ‘निसर्गदूत फाऊंडेशन’ची स्थापना ! – राहुल चिकोडे, भाजप

सध्या पर्यावरणाच्या असमतोलामुळे प्राणवायूचे प्रमाण अल्प होत आहे. पाणी, वायू आणि ध्वनी प्रदूषण यात सातत्याने वाढ होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.

आयर्विन पुलाला नियोजित समांतर पूल केल्यामुळे सांगलीची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, असा अपप्रचार ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

‘आयर्विन पुलाला नियोजित समांतर पूल केल्यामुळे सांगलीची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, अशी भीती काही व्यापार्‍यांना घालून संपूर्ण सांगलीच्या विकासालाच स्थगिती देण्याचा उद्योग काही मंडळी करत आहेत.’

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवा !

त्यामुळे आता मुकेश अंबानी यांच्या निवासाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू या दोन्ही प्रकरणांचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण आयोगाकडे सोपण्यात आले आहे.