कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथे होळी, धूलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास अनुमती देण्याविषयी निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुढील २ आठवड्यांसाठी आठवडी बाजार बंद ठेवा ! – जयंत पाटील, पालकमंत्री

गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे राबवाव्यात, अशा सूचना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

सचिन वाझे यांचे सहकारी अतिरिक्त पोलीस निरीक्षक रियाझ काझी माफीचे साक्षीदार !

रियाझ काझी हे या प्रकरणात अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे सहकारी आहेत.

सातारा येथे होणार ‘जिल्हा पालक संघा’ची स्थापना ?

कोरोनाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील खासगी शाळांची दादागिरी वाढत आहे. शाळांच्या त्रासाला कंटाळून सातारा येथील पालकांनी संघटित होत लोकशाही मार्गाने विरोध करण्याचे ठरवले आहे.

सोलापूर विद्यापिठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ !

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे परीक्षा संचालक शाह यांनी सांगितले.

सांगली महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला ‘आय.एस्.ओ. ९००१’ प्रमाणपत्र प्राप्त !

‘आय.एस्.ओ. ९००१’ हे प्रमाणपत्र पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते २३ मार्च या दिवशी आयुक्त नितीन कापडणीस यांना प्रदान करण्यात आले.

रेठरे बुद्रुक सोसायटीच्या खत विभागात २३ लाख रुपयांचा अपहार !

तळागाळातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी नीतीवान समाज निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी धर्मशिक्षण द्यायला हवे !

पुण्यातील कारागृह अधीक्षकांनी मागितली राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची अनुमती !

पोलीस खात्यातील अनेक अधीक्षक दबावाखाली काम करत असल्याचेही सांगत त्यांच्यावर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप हिरालाल जाधव यांनी केला आहे.

सरकारला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रपती राजवटीची मागणी ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

 मंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले, महाराष्ट्र पोलिसांचे जगभर नाव असतांना दुसर्‍या यंत्रणेकडून अन्वेषण करा, असे म्हणायचे म्हणजे महाराष्ट्र पोलिसांवर अविश्वास दाखवल्यासारखेच आहे.

कोल्हापूर महापालिकेचा ६२३ कोटी रुपयांचा जमेचा अर्थसंकल्प संमत

शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण, संवर्धन यांसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.