मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवा !

आतंकवादविरोधी पथकाला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश

मनसुख हिरेन

मुंबई – मनसुख हिरेन यांच्या हत्येचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे हस्तांतरित करण्याचा आदेश ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने आतंकवादविरोधी पथकाला दिला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आतंकवादविरोधी पथकाला या प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्याचा आदेश दिला होता; मात्र यानंतरही आतंकदविरोधी पथकाकडून या प्रकरणाचे अन्वेषण चालू होते. त्यामुळे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून न्यायालयाने आतंकवादविरोधी पथकाला वरील आदेश दिला. त्यामुळे आता मुकेश अंबानी यांच्या निवासाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू या दोन्ही प्रकरणांचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण आयोगाकडे सोपण्यात आले आहे.