कुंभमेळ्याला येणार्‍या भाविकांना कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर करावाच लागणार !

उत्तराखंड उच्च न्यायालयाचा आदेश

हरिद्वार (उत्तराखंड) – येथील कुंभमेळ्यासाठी येणार्‍या भाविकांना कोरोना चाचणी नकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या संदर्भात उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्य सरकारने अशा प्रकारचे प्रमाणपत्र सादर करण्याचा पूर्वीचा नियम रहित केल्यावरून सरकारवर टीका करत हा निर्णय दिला. माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कुंभमेळ्याला येणार्‍या भाविकांनी असे प्रमाणपत्र आणणे बंधनकारक केले होते; मात्र नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी हा नियम रहित केला होता.

त्याविरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. न्यायालयाने आदेशामध्ये कोरोना लस घेणार्‍यांना असा अहवाल सादर न करण्याची सूट दिली आहे.