मतदारांना भेटण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वसाधारण निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग यांची नियुक्ती

 ४६- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भारत निवडणूक आयोग, नवी देहली यांच्याकडून नागरिक आणि मतदार यांना भेटण्यासाठी सर्वसाधारण निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिली आहे.

पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी विशेष रेल्वेगाड्या धावणार !

 उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

पुणे येथे पथारी व्यावसायिकांकडे ५६ कोटी रुपयांची थकबाकी !

शहरातील ९ सहस्र ८५२ पथारी (फेरीवाले) व्यावसायिकांची अंदाजे ५६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. ही थकबाकी भरावी अन्यथा परवाना रहित केला जाईल, अशी चेतावणी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिली आहे.

मतदानाच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश

मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, यासाठी मतदानाच्या दिवशी मंगळावर, ७ मे या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी, तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

मतदान करतांना कोणत्याही आमिषाला बळी पडू नका !  – ह.भ.प. अक्षयमहाराज भोसले

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे, यावर सकल ग्रामस्थांनी भर द्यावा. मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे.

नृत्यसाधकांनी विज्ञानाची कास धरत कलासाधनेतील नवीन आयाम शोधावेत ! – डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणकतज्ञ

‘शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था’ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभिजात नृत्यकलेला समर्पित असलेल्या ‘अटेंडन्स’ या नृत्य वार्षिक अंकाच्या रौप्यमहोत्सवी अंकाचे प्रकाशन डॉ. भटकर यांच्या उपस्थितीत झाले, त्या वेळी ते बोलत होते.

आनंद देता येत नसल्यास कुणालाही दुःख देऊ नये ! – आचार्य श्रीगुरु डॉ. सुनीलदादा लुले

तत्वज्ञान दुसर्‍याला शिकवण्यासाठी नसते तर स्वतःला जगण्यासाठी असते. जीवनात घेतलेल्या अनुभवाचे प्रतीक चेहर्‍यावरील सुरकुत्या असतात.

‘भाजप काम करो अथवा ना करो आम्ही प्रामाणिकपणे लोकसभेसाठी भाजपचे काम करणार !’ – गुलाबराव पाटील

भाजप काम करो अथवा ना करो, आम्ही प्रामाणिकपणे लोकसभेचे काम करणार आहोत’, असे विधान पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी ५ मे या दिवशी जळगाव येथे केले.

मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज ! – जिल्हाधिकारी

७ मे या दिवशी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणार्‍या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे. दोन्ही मतदारसंघात मिळून ३ सहस्र ९८६ मतदान केंद्रांचा वापर करण्यात येणार आहे.