|
करहल (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशात २० नोव्हेंबर या दिवशी विधानसभेच्या ९ जागांवर पोटनिवडणुका झाल्या. या दिवशी एका हिंदु तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह बॅगेत आढळून आला आहे. मृत तरुणीच्या आईने या घटनेनंतर समाजवादी पक्षावर आरोप केला आहे. प्रशांत यादव नामक व्यक्तीने माझ्या मुलीचा राजकीय वैमनस्यातून खून केला, असा आरोप मुलीच्या आईने केला.
मृत तरुणीच्या आईने पुढे म्हटले की, माझ्या मुलीचा खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. माझ्या मुलीने भाजपला मतदान करण्याचा निर्णय बोलून दाखवल्यामुळे प्रशांत नाराज होता. ‘जर तिने समाजवादी पक्षाला मतदान केले नाही, तर परिणामांना सामोरे जावे लागेल’, अशी धमकी तिला देण्यात आली होती.
२ प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, १९ नोव्हेंबरला दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी तरुणीला बलपूर्वक दुचाकीवर बसवून पळवून नेले. त्यानंतर तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून प्रशांत यादव आणि मोहन कथेरिया यांच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाअशा कार्यकर्त्यांचा भरणा असलेला पक्ष सत्तेवर आल्यावर जनतेला कायद्याचे राज्य कधीच मिळणार नाही ! अशा पक्षांवर बंदीच घातली पाहिजे ! |