बंगालच्या एका मशिदीत नमाजपठणावरून २ गटात हाणामारी : एकाचा मृत्यू
कोलकाता (बंगाल) – कोलकाता उच्च न्यायालयाने पोलिसांना पूर्व मिदनापूरमधील मशीद नियंत्रणात घेण्याचा आदेश दिला. नमाजपठण करणार्यांच्या २ गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर हा आदेश देण्यात आला आहे. या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
१. ७ नोव्हेंबर २०२४ या दिवशी उच्च न्यायालयाने पूर्व मिदनापूरमधील एगरा येथील मशिदीत वेगवेगळ्या वेळी उपासकांच्या २ वेगवेगळ्या गटांना नमाजपठण करण्याचा आदेश दिला होता; मात्र न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नाही. (न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणारे धर्मांध मुसलमान ! – संपादक) त्यानंतर १३ नोव्हेंबर या दिवशी दोन्ही गटांमध्ये मोठा हिंसाचार झाला. यात एकाचा मृत्यू झाला, तर ८ जण घायाळ झाले. पोलिसांनी या प्रकरणात २ जणांना अटक केली आहे.
२. उच्च न्यायालयाने म्हटले की, पोलिसांना मशीद कह्यात घेऊ द्या आणि एगरा पोलीस ठाण्याच्या प्रमुखांच्या अनुमतीखेरीज कुणालाही येथे प्रवेश दिला जाणार नाही. आम्ही खूप विचार केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. जर पुन्हा हिंसाचार झाला आणि कुणाचाही मृत्यू झाला, तर मशिदीत नमाजपठणावर बंदी घातली जाईल. धर्मावरून कुणाचाही मृत्यू होऊ नये. (हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मशिदीसमोरून जातात, तेव्हा त्यांच्यावर मशिदींतून आक्रमण केले जाते, अशा प्रकरणांतही ‘मशीद पोलिसांनी कह्यात घ्यावी’, असा आदेश देण्यात यावा, असे हिंदूंना वाटते ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|