इजाज लकडावाला याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने केली अटक

मुंबई पोलिसांनी यापूर्वी बिहारची राजधानी पाटणा येथून जानेवारी २०२० मध्ये लकडावाला याला अटक केली होती. त्यापूर्वी २० वर्षांपासून तो पसार होता. तो अन्य देशांत वास्तव्य करून त्याची टोळी चालवत होता. त्याच्यावर २५ हून अधिक गुन्हे नोंद आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याच्या प्रकरणी थेट पंतप्रधानांकडे तक्रार

ग्राहकांनी अधिकोषांची स्थिती पाहून त्यात पैसे गुंतवायचे का ते ठरवावे !

ठाणे येथे प्रवाशांना लुटणारी धर्मांधांची टोळी अटकेत

कामानिमित्त पहाटेच्या वेळी रिक्शाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना लुटणारे मोहम्मद हयात सय्यद (वय ३० वर्षे), मुस्तफा पावसकर (वय ३७ वर्षे) आणि मुज्जमील उपाख्य गुड्डू उपाख्य हॉरर शेख (वय २४ वर्षे) या तिघा जणांच्या टोळीला डायघर पोलिसांनी अटक केली आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी सातारा येथून छत्रपती संभाजीनगर असे फलक लावूनच एस्.टी. बसगाड्या आगाराबाहेर पाठवल्या

या वेळी प्रसिद्धीमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करतांना मनसेचे सातारा जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे म्हणाले की, पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर पक्ष नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेने राज्यभरात नामांतरासाठी जनआंदोलन चालू केले आहे.

सातारा येथे शेतकर्‍यांचे आंदोलन

कृषी कायद्याविरोधात देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पुलाखाली विविध शेतकरी संघटनांनी रस्ता बंद करत चक्का जाम आंदोलन केले.

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेची बेकरी उत्पादने, तसेच अन्य उत्पादने यांच्या वेष्टनांवरील हनुमानाचे चित्र काढून टाकावे !

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्था मर्यादितचे जनरल मॅनेजर यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन

पाकमध्ये प्रत्येक नागरिकावर १ लाख ७५ सहस्र रुपयांचे कर्ज !

काही वर्षांत जगाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यापूर्वी ‘दिवाळखोर देश’ घोषित केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

मुसलमान पुरुष पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह करू शकतो; मात्र मुसलमान महिला असे करू शकत नाही !  – पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालय

चक्रावणारा न्याय !

पिंपरी-चिंचवड येथील आर्टीओ परिसरात आग लागून २ वाहने जळून खाक

आर्टीओ परिवहन कार्यालयाच्या परिसरात अनुमाने १५९ वाहने होती. परिसराच्या एका भिंतीजवळ कचर्‍याला दुपारी अचानक आग लागली.

कोरोना काळातील शाळेचे १०० टक्के शुल्क भरावे लागणार ! – सर्वोच्च न्यायालयाचा विद्यार्थांच्या पालकांना आदेश

राजस्थानमधील एका शाळेच्या व्यवस्थापन समितीने या संदर्भात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने असा आदेश दिला आहे.