कोरोना काळातील शाळेचे १०० टक्के शुल्क भरावे लागणार ! – सर्वोच्च न्यायालयाचा विद्यार्थांच्या पालकांना आदेश

( प्रतिकात्मक चित्र )

नवी देहली – कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शाळेचे १०० टक्के शुल्क भरावे लागणार, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. पालकांना ५ मार्च २०२१ पासून ६ टप्प्यांत हे शुल्क भरायचे आहे.

न्यायालयाने असेही स्पष्ट केले, ‘शालेय शुल्क भरले नाही, या कारणामुळे एकाही विद्यार्थ्याचे नाव शाळेतून काढू नये. तसेच दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरले नाही; म्हणून परीक्षेला बसण्यापासून मज्जाव केला जाऊ नये.’ राजस्थानमधील एका शाळेच्या व्यवस्थापन समितीने या संदर्भात याचिका प्रविष्ट केली होती.