मुसलमान पुरुष पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह करू शकतो; मात्र मुसलमान महिला असे करू शकत नाही !  – पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालय

चंडीगड – पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता मुसलमान पुरुष दुसरा विवाह करू शकतो; मात्र हाच नियम मुसलमान महिलांसाठी लागू होत नाही, असा निर्णय पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. मुसलमान दांपत्याने प्रविष्ट केलेल्या एका याचिकवर हा निकाल देण्यात आला.