पाकमध्ये प्रत्येक नागरिकावर १ लाख ७५ सहस्र रुपयांचे कर्ज !

काही वर्षांत जगाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यापूर्वी ‘दिवाळखोर देश’ घोषित केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १ लाख ७५ सहस्र रुपयांचे कर्ज आहे, अशी माहिती पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकच्या संसदेत दिली. त्यांच्या सरकारच्या काळात या कर्जामध्ये ५४ सहस्र ९०१ रुपयांची भर पडल्याचेही त्यांनी सांगितले. ही रक्कम एकूण कर्जाच्या ४६ टक्के आहे. म्हणजे इम्रान खान सरकार सत्तेत येण्यापूर्वी पाकच्या एका नागरिकावर १ लाख २० सहस्र ९९ रुपये कर्ज होते.