ठाणे, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – कामानिमित्त पहाटेच्या वेळी रिक्शाने प्रवास करणार्या प्रवाशांना लुटणारे मोहम्मद हयात सय्यद (वय ३० वर्षे), मुस्तफा पावसकर (वय ३७ वर्षे) आणि मुज्जमील उपाख्य गुड्डू उपाख्य हॉरर शेख (वय २४ वर्षे) या तिघा जणांच्या टोळीला डायघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून भ्रमणसंगणक, पॉवर बँक, आधारकार्ड आणि चोरीसाठी वापरलेली रिक्शा असा एकूण ६५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना ८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. हे तिघेही मुंब्रा परिसरात रहाणारे असून चोरी आणि जबरी चोरी करणार्या टोळीतील सराईत गुन्हेगार आहेत. (गुन्हेगारांचा भरणा असलेले मुंब्रा शहर ! – संपादक) यातील मोहम्मद सय्यद याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाणे येथे ५, तर नांदेड येथील लकडगंज पोलीस ठाणे येथे दरोड्याचा १, असे ६ गुन्हे नोंद आहेत. मुस्तफा याच्याविरुद्ध मुंबई, ठाणे येथे चोरीचे ६ गुन्हे नोंद आहेत. (कठोर शिक्षा होत नसल्यामुुळेच धर्मांधांना आता कायद्याचे भय वाटत नाही ! – संपादक)