पिंपरी-चिंचवड येथील आर्टीओ परिसरात आग लागून २ वाहने जळून खाक

पिंपरी-चिंचवड – येथील आर्टीओ परिवहन कार्यालयाच्या परिसरात ५ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ३ वाजता आग लागल्याने २ वाहने जळून नष्ट झाली. या परिसरात जप्त केलेली अनुमाने १५९ वाहने होती. परिसराच्या एका भिंतीजवळ कचरा साठला होता. कचर्‍याला दुपारी अचानक आग लागली. अग्नीशमन दलाच्या २ गाड्यांनी आग विझवली; परंतु गाड्या परत गेल्यावर पुन्हा थोड्या वेळाने तेथे आग लागली. आर्टीओचे साहाय्यक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन आग विझवण्यास साहाय्य केले. (साचलेला कचरा जर वेळीच हलवला असता, तर ही घटना टाळता आली असती. – संपादक)