औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना लस द्या ! – भाजप उद्योग आघाडीचे निवेदन

या मागणीचे निवेदन भाजप उद्योग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश आरवडे, नाना कांबळे उपस्थित होते.

सोलापूर येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी सात सदस्यीय समिती घोषित !

रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा आणि वाटप प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात यावे, तसेच रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हास्तरीय ७ सदस्यांची समिती घोषित केली आहे.

नांदेड येथील काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन !

१७ मार्च या दिवशी रावसाहेब अंतापूरकर यांचा कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला होता. रावसाहेब अंतापूरकर हे कोरोनामुळे निधन झालेले भारत भालके यांच्यानंतरचे दुसरे विद्यमान आमदार आहेत.

वाळूज (संभाजीनगर) येथे ऑक्सिजन सिलिंडर उष्ण होऊन रुग्णवाहिकेत स्फोट !

रुग्णवाहिकेत ठेवलेला ‘इन्व्हर्टर’ आणि ‘बॅटरी’ यांच्याजवळ ‘शॉर्टसर्किट’ होऊन आग लागली. त्यामुळे त्याच्या बाजूला असलेला ऑक्सिजन सिलिंडर उष्ण होऊन मोठा स्फोट होऊन गाडीचे अवशेष ५० फूट लांब जाऊन पडले.

माहिती अधिकाराचा अर्ज दिला म्हणून सरपंचांकडून ग्रामस्थाला मारहाण !

गुरुदास काळेल यांनी गावातील गायरान जमिनीवर असणार्‍या घरांचे ‘८ अ’चे उतारे मिळावेत, यासाठी ग्रामसेवकाकडे माहिती अधिकारामध्ये अर्ज दिला होता. अर्ज का दिला ? असे विचारत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी मारहाण केली. 

नागपूर येथे कोविड रुग्णालयातील भीषण आगीत ४ रुग्णांचा मृत्यू

यापूर्वी कोविड रुग्णालयांना लागलेल्या आगीतून प्रशासनाने ना कोणता धडा घेतला, ना उपाययोजना काढल्या. त्यामुळेच परत परत अशी आग लागत आहे. उत्तरदायी असणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

कोरोनाच्या चाचणीच्या खोटा अहवाल देणार्‍या खासगी प्रयोगशाळेच्या धर्मांध तंत्रज्ञाला अटक !

रुग्णांची फसवणूक करणार्‍या धर्मांधांना कठोर शासन करावे !

बंगालमध्ये मतदानाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू

भारतात काही ठिकाणी मतदानाच्या वेळी हिंसाचार होणे ही सर्वसामान्य घटना झाली आहे. बॉम्ब, बंदूक आदींचा सर्रास वापर या वेळी केला जातो. यातून भारतातील मतदान कसे होते, हे लक्षात येते !

बंगालमध्ये आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या बिहारच्या पोलीस अधिकार्‍याची जमावाकडून हत्या !

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा आधीच उडालेले आहेत; मात्र याकडे सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याने, तसेच केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट न लावल्याने एका पोलीस अधिकार्‍यांची हत्या झाली, हे राजकीय पक्षांना लज्जास्पद !

भाजपने हिंदुत्वाचे वातावरण निर्माण केल्याने कदाचित् आम्हाला मते मिळणार नाहीत ! – राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

काँग्रेसने सत्तेत असतांना सतत हिंदुविरोधी निर्णय घेतले. त्यामुळे हिंदूंनी काँग्रेसला सत्ताच्यूत केले. तरीही काँग्रेस मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न सोडत नाही. त्यामुळे काँग्रेसचे अधःपतन निश्‍चित आहे !