औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना लस द्या ! – भाजप उद्योग आघाडीचे निवेदन

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना आमदार सुधीर गाडगीळ आणि अन्य

सांगली, १० एप्रिल (वार्ता.) – सांगली, मिरज येथील औद्योगिक वसाहतीतील मजूर परप्रांतीय आहेत. व्यवसाय बंद पडल्यास उपासमारीची वेळ येऊन ते गावी जातील. येथील व्यवसाय कोलमडेल. त्यामुळे आरोग्ययंत्रणेच्या माध्यमातून कामगारांना कोरोनाची लस देण्यात यावी, या मागणीचे निवेदन भाजप उद्योग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना ९ एप्रिलला देण्यात आले. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश आरवडे, नाना कांबळे उपस्थित होते.