संभाजीनगर – जिल्ह्यातील भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका ८ एप्रिल या दिवशी इंधन भरण्यासाठी वाळूजलगतच्या पेट्रोल पंपाकडे जात होती. रुग्णवाहिकेत ठेवलेला ‘इन्व्हर्टर’ आणि ‘बॅटरी’ यांच्याजवळ ‘शॉर्टसर्किट’ होऊन आग लागली. त्यामुळे त्याच्या बाजूला असलेला ऑक्सिजन सिलिंडर उष्ण होऊन मोठा स्फोट होऊन गाडीचे अवशेष ५० फूट लांब जाऊन पडले. यामुळे संभाजीनगर-नगर मार्गावरील वाहतूक अर्धा घंटा खोळंबली होती.