सोलापूर – रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा आणि वाटप प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात यावे, तसेच रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हास्तरीय ७ सदस्यांची समिती घोषित केली आहे. रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्यास राज्यस्तरीय अन्न आणि औषध प्रशासन यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले आहेत.