
मुंबई – नांदेडच्या देगलूर बिलोली मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर (वय ६३ वर्षे) यांचे ९ एप्रिल या दिवशी कोरोनामुळे निधन झाले. येथील बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. १७ मार्च या दिवशी रावसाहेब अंतापूरकर यांचा कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला होता. रावसाहेब अंतापूरकर हे कोरोनामुळे निधन झालेले भारत भालके यांच्यानंतरचे दुसरे विद्यमान आमदार आहेत. यापूर्वी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर सध्या पोटनिवडणूक होत आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल