भाजपने हिंदुत्वाचे वातावरण निर्माण केल्याने कदाचित् आम्हाला मते मिळणार नाहीत ! – राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

काँग्रेसने सत्तेत असतांना सतत हिंदुविरोधी निर्णय घेतले. त्यामुळे हिंदूंनी काँग्रेसला सत्ताच्यूत केले. तरीही काँग्रेस मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न सोडत नाही. त्यामुळे काँग्रेसचे अधःपतन निश्‍चित आहे !

मुख्यमंत्री अशोक गेहलोत

जयपूर (राजस्थान) – भाजप आणि रा.स्व. संघ केवळ हिंदुत्वाच्या गोष्टी करतात. त्यामुळे हिंदुत्वाचे वातावरण निर्माण झाल्याने आम्ही घाबरलो आहोत. यामुळे कदाचित् लोक आम्हाला मत देणार नाहीत; मात्र घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्हाला निर्भय होऊन आपल्या विचारसरणीवर चालले पाहिजे. यशस्वी तोच होतो जो सत्याच्या मार्गावर चालतो, असे फुकाचे विधान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या ५१ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना केले.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विधानावर भाजपचे नेते राजवर्धनसिंह राठोड म्हणाले की, लोकांच्या मनात भीती नाही, तर विश्‍वास निर्माण झाला आहे. भाजप आणि संघाचे कार्यकर्ते पूर्णनिष्ठेने राष्ट्रसेवा करत आहेत. यामुळेच देशात राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि ‘सबका साथ आणि सबका विकास’ याचे वातावरण निर्माण झाले आहे.