चीनला मागे टाकत भारत झाली जगातील ‘सर्वांत आकर्षक उदयोन्मुख बाजारपेठ’ !

भारताची सुधारित व्यापारी आणि राजकीय स्थिरता, अनुकूल समाजघटक, गुंतवणूकदारांना मैत्रीपूर्ण वातावरण प्राप्त करून देण्यासाठीचे प्रयत्न यांमुळे अधिकाधिक आस्थापने भारताकडे वळत आहेत.

कोकण रेल्वेमार्गावर  ११ आणि १२ जुलैला ‘मेगाब्लॉक’

१२ जुलै या दिवशी कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या कामासाठी घेण्यात येणार्‍या दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा ३ घंट्यांच्या ‘मेगाब्लॉक’मुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या ४ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

अक्षयकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात अयोग्य पद्धतीने दाखवणारा ‘ओ.एम्.जी. -२’ चित्रटाचा ‘टीझर’ प्रदर्शित !

‘ओ.एम्.जी. -२’ ‘टीझर’मध्ये कपाळाला भस्म, मस्तकावर जटा, गळ्यात रूद्राक्षाची माळ, नीळा कंठ या भगवान शिवाच्या रूपात अभिनेते अक्षयकुमार रस्त्यावरून चालत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

ज्ञान आणि प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारा पुणे येथील सनातनचा गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

या महोत्सवात समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार, तसेच ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन झाले. तसेच स्वसंरक्षण प्रात्यक्षिके हे विशेष आकर्षण ठरले.

अल्पवयीन हिंदु मुलीचा धर्मांतरास नकार दिल्याने अरमान खानने तिला नेपाळमध्ये नेऊन केला सामूहिक बलात्कार !

अरमान आणि त्याच्या ३ मुसलमान मित्रांनी तिला गाठून गुंगीच्या औषधाचा वास दिला आणि बेशुद्धावस्थेत तिला नेपाळला नेले. तेथे चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

बिहारमध्ये कावड यात्रेवर जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणाची शक्यता ! – गुप्तचर विभागाची माहिती

हिंदूंचे प्रत्येक सण आणि उत्सव अजूनही जिहादी आतंकवाद्यांच्या सावटाखालीच साजरे करावे लागतात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे !

देशातील ६७.२ टक्के मुसलमान महिला समान नागरी संहितेसाठी अनुकूल ! – सर्वेक्षण

सर्वेक्षणानुसार ६७.२ टक्के मुसलमान महिलांनी विवाह, तलाक आणि दत्तक घेणे, यांसारख्या सूत्रांसंदर्भात समान नागरी कायद्याचे समर्थन केले आहे.

केवळ १०० वर्षांहून अधिक काळ थडगे अस्तित्वात आहे; म्हणून ते ‘संरक्षित स्मारक’ ठरू शकत नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

केवळ १०० वर्षांहून अधिक काळ थडगे अस्तित्वात आहे; म्हणून ते ‘प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम,१९५८’ कायद्याच्या अंतर्गत ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्याचे कारण ठरू शकत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका आदेशात नमूद केले.

ट्विटरवर पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान दिसत आहे भारताचा भाग !

येथील नागरिकांनी जेव्हा पाक सरकारचे अधिकृत ट्विटर खाते पहाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते प्रतिबंधित  करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.

(म्हणे) ‘भारतातील ख्रिस्ती धर्माला संपवता येईल, असा कुणी विचार करू नये !’ – आर्चबिशप क्लेमिस, केरळ

भारतातील ख्रिस्ती धर्माला संपवण्याविषयी कुणी काही बोलत नसतांना आणि काही करत नसतांना अशा प्रकारचे विधान करून हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवण्याचाच पाद्य्रांचा हा प्रयत्न आहे, हे लक्षात घ्या !