गाझियाबाद येथील डासना देवी मंदिरात संशयास्पदरित्या आलेले दोघे पोलिसांच्या कह्यात !

यावरून उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंचे संत, महंत, साधू हे असुरक्षित असल्याचे लक्षात येते. यास्तव राज्य सरकारने संत, महंतांना अधिक सुरक्षा प्रदान करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा एक डोस पुरेसा ! – बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाचे संशोधन

हे संशोधन अमेरिकेतील जर्नल सायन्स इम्यूनोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यासाठी निवडण्यात आले आहे.

गोंडा (उत्तरप्रदेश) येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटात २ घरे उद्ध्वस्त झाल्याने ८ जणांचा मृत्यू

एका घरात जेवण बनवत असतांना गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातामध्ये २ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

श्रीराममंदिरासाठी रचला जात आहे ४४ थरांचा पाया !

श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिराचे काम वेगाने चालू आहे. सध्या मंदिराच्या पायाभरणीचे काम चालू आहे. मंदिरासाठी ४४ थरांचा पाया रचला जात आहे. आतापर्यंत ६ थरांचे काम पूर्ण झाले आहेे, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली.

हिंदु पोलीस अधिकारी असल्याचे सांगून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणार्‍या धर्मांधाला अटक

देशात अशा प्रकारे बनावट मतदान ओळखपत्रे बनवली जातात, हे पोलिसांना आणि प्रशासनाला ठाऊक कसे नाही ? संबंधित उत्तरदायींना देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत कठोर शिक्षा केली पाहिजे ! – संपादक

सैफई (उत्तरप्रदेश) येथे मद्य विक्रीच्या दुकानांबाहेर ‘लस घेतलेल्यांनाच दारू मिळणार’ अशी सूचना !

‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असा हा प्रकार होय ! त्यापेक्षा मद्याची दुकानेच बंद केली, तर बर्‍याच समस्या सुटतील, हे प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ?

कोरोना लस भरलेल्या सीरिंज फेकून देणार्‍या आरोग्य कर्मचारी नेहा खान यांच्यावर गुन्हा नोंद

जमालपूरच्या शहर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कचरापेटीमध्ये कोरोना लस भरलेल्या २९ सीरिंज सापडल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी येथील लसीकरण विभागाच्या प्रमुख असणार्‍या नेहा खान यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

प्रयागराज येथील एका पोलिसाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचा माहिती अधिकार कार्यकर्त्याचा आरोप

एका पोलीस शिपायाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्या आणि सदनिका, तसेच भूमीही आहे. त्याच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नूतन ठाकूर यांनी केली आहे.

काही अ‍ॅलोपॅथी डॉक्टर राक्षसांपेक्षाही वाईट ! – भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह

अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धत अवलंबणार्‍या डॉक्टरांपैकी काही जण भ्रष्ट असून त्यांचा मी विरोध करतो, अशी विधाने बैरिया मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केली आहेत.

मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह केल्यानंतर तिला संरक्षण पुरवण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा पोलिसांना आदेश

मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारल्यावर आणि हिंदु तरुणाशी विवाह केल्यावर तिला ठार मारण्याची धमकी मिळते आणि निधर्मीवादी याविषयी मौन बागळतात, हे लक्षात घ्या !