काही अ‍ॅलोपॅथी डॉक्टर राक्षसांपेक्षाही वाईट ! – भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह

भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह

बलिया (उत्तरप्रदेश) – आज अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीमध्ये १० रुपयांची एक गोळी १०० रुपयांना विकली जाते. हे लोक समाजहिताचे काम करणारे नाहीत. रुग्णाच्या मृत्यूनंतर काही अ‍ॅलोपॅथी डॉक्टर रुग्णाला अतीदक्षता विभागामध्ये ठेवून पैसे उकळतात. अ‍ॅलोपॅथीचे काही डॉक्टर राक्षसांपेक्षाही वाईट काम करत आहेत. रुग्णांची काळजी घेण्यासाठी अगदी मनापासून काम करणार्‍या काही अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचे मला कौतुक आहे; मात्र अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धत अवलंबणार्‍या डॉक्टरांपैकी काही जण भ्रष्ट असून त्यांचा मी विरोध करतो, अशी विधाने बैरिया मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केली आहेत. सिंह यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अ‍ॅलोपॅथीविषयी विधाने करणारे योगऋषि रामदेवबाबा यांचे समर्थन केले आहे.

सौजन्य : News Nation

आमदार सिंह पुढे म्हणाले की, समाजाने आयुर्वेदीय उपचार पद्धती आणि योग अभ्यास या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदीय उपचारपद्धत समान आहे. रामदेव बाबांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून ‘सदृढ भारत, सशक्त भारत’ मोहीम चालू केली असून हे काम कौतुकास्पद आहे.