मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह केल्यानंतर तिला संरक्षण पुरवण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा पोलिसांना आदेश

तरुणीच्या कुटुंबियांकडून ठार मारण्याची धमकी

  • मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारल्यावर आणि हिंदु तरुणाशी विवाह केल्यावर तिला ठार मारण्याची धमकी मिळते आणि निधर्मीवादी याविषयी मौन बागळतात, हे लक्षात घ्या !
  • हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करणार्‍या धर्मांधांच्या विरोधातही हिंदु संघटनांनी आवाज उठवल्यावर निधर्मीवादी याचा विरोध करतात, हे लक्षात घ्या !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने मेरठ पोलीस अधीक्षकांना मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारून हिंदु तरुणाशी विवाह केल्यानंतर तिला सुरक्षा पुरवण्याचा आदेश दिला. तिच्या वैवाहिक जीवनात पोलिसांनी हस्तक्षेप करू नये, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच तिचे वडील किंवा कुटुंबांतील व्यक्ती, त्यांचे मित्र अथवा प्रसारमाध्यमांतील लोकांकडून तिला शारीरिक दुखापत करणार नाही, याचीही काळजी घेण्यास सांगितले आहे. न्यायालयाने या प्रकरणात राज्य सरकारला पुढील ४ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे.

हिंदु झाल्यानंतर या तरुणीने स्वतःचे ‘यती’ असे नामांतर केले. तिने धर्मांतर केल्यावर जिल्हाधिकार्‍यांना याची माहिती दिली होती, तसेच वर्तमानपत्रातही याविषयी माहिती प्रसिद्ध केली होती. तिने एप्रिल मासात हिंदु तरुणाशी विवाह केला होता. त्यानंतर तिला तिच्या कुटुंबियांकडून ठार मारण्याची धमकी मिळू लागल्यावर तिने न्यायालयात धाव घेतली होती.