हिंदु पोलीस अधिकारी असल्याचे सांगून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणार्‍या धर्मांधाला अटक

धर्मांधांचा लव्ह जिहाद !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथे आबिद हवारी याने स्वतः ‘आदित्य सिंह’ असे नाव सांगून तो पोलीस अधिकारी असल्याचे सांगत हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तो या मुलींशी विवाह करून नंतर त्यांचे धर्मांतर करत होता. आबिद विवाहित असून त्याला ५ मुले आहेत. त्याने ३ हिंदु तरुणीशी विवाह केला आहे. या प्रकरणी विवाह केलेल्या एका तरुणीने तक्रार केल्यानंतर आबिद याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे आदित्य सिंह या नावाने मतदान ओळखपत्र सापडले आहे. (देशात अशा प्रकारे बनावट मतदान ओळखपत्रे बनवली जातात, हे पोलिसांना आणि प्रशासनाला ठाऊक कसे नाही ? संबंधित उत्तरदायींना देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत कठोर शिक्षा केली पाहिजे ! – संपादक)